पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'वृत्तांत 19 म्हणजे काय ? ' वृत्त" म्हणजे वार्ता किंवा बातमी आणि वृत्तांत म्हणजे घडलेली हकीगत. एखादी घटना, प्रसंग, त्यात असलेली व्यक्तीची गुंतवणूक किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातील, त्यांच्याशी संलग्न अशी घटना किंवा प्रसंग, यथार्थपणे नेटक्या शब्दात काही महत्त्वाच्या गोष्टींच्या, उदा. : स्थळ, काळ, कृती इत्यादींच्या तपशीलासह कथन करणे याला वृत्तांत म्हणतात, वृत्तांतात स्वतःच्या वैयक्तिक भाष्याला फारसा वाव नसतो. निःसंदिग्ध भाषेत, सरळ घडलेल्या गोष्टींचे घटना, प्रसंग, व्यक्तींच्या संदर्भातील काही क्षणांचे, त्यात निवेदन असते. वृत्तांत म्हणजे वार्ताविहार, नवी माहिती, ताज्या घटनांचा वृत्तांत, आकर्षक माहिती. ज्याचे वृत्त देता येईल अशा नव्या घटना, किंबहुना कोणतीही प्रसंगोपात्त घटना, वृत्तांत हा वाचकांना नेहमीच आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटला पाहिजे. वृत्तांताचा महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांना, वाचकांना आकर्षक वाटला पाहिजे. 66 6 जॉन बोगार्ट याने वृत्त वैशिष्ट्याचे उदाहरण देतांना म्हटले आहे की. ' कुत्रं माणसाला चावल' ती वार्ता होत नाही, कारण ही नेहमी घडणारी घटना असते, पण 'माणूस कुत्र्याला चावला तर ती वार्ता होते." म्हणजे वृत्त है साधारणपणे कुतूहलजनक, खळबळ - जनक, रोचक, वैधक असावे. वृत्तांताची दोन शब्दात व्याख्या करावयाची झाल्यास " चांगला मजकूर " अशी करता येईल. " वृत्तसाधना" या व्याख्यान-ग्रंथात श्री. द्वा. भ. कर्णिकांनी नमूद केल्याप्रमाणे पत्रकार आपल्या स्वतःशी ते प्रश्न करीत असतात. ३१