पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

SSP ई वृत्तलेखन लकार 550 1४ वृत्तलेखन हा एक नित्याचा परिचित आणि अत्यंत उपयुक्त विषय आहे. आपल्या दररोजच्या जीवनात, व्यवहारात कितीतरी पाहिलेले – अनुभवलेले सारेच आपल्याला सांगावे लागते. त्यात कथात्मकता, निवेदनशैली अवतरलेली आढळते. सभा, संमेलने, विविध कार्यक्रमांचे इतिवृत्त आणि वृत्तांत लिहिण्याची जबाबदारीही अनेकदा आपणास पेलावी लागते. वार्ताहर, बातमीदार, संपादक. होण्यासाठीही वृत्तांतलेखन- संकलन सराव असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच येथे वृत्तांत लेखनाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तात - लेखन हे शास्त्र असण्यापेक्षा ती एक कलाहो आहे असे म्हणता येईल. (is तात्पर्य लेखक, नेता, संपादक, उपसंपादक, : वार्ताहर या सगळ्यांनाच वृत्तांत- लेखनाची कला अवगत असणे आवश्यक. ठरते. नेत्यांचाही येथे समावेश करण्याचे कारण त्यानाही प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करावे लागते. त्यांना तेथेही व परतल्यानंतरही झालेल्या कार्याचे, सभांचे तपशीलवार वृत्त सादर करावेच लागतात. या वृत्तात कथनातूनच नेत्याचे सारै ' गुणावगुण प्रकर्षाने लक्षात येतात, 'विशेष कौशल्य दिसते. विविध- संस्थांचे चिटणीस, कार्यवाह ! यांनाही वृत्तांत कंथनाच्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. यावरून समाजात वक्तृत्व कलेप्रमाणेच वृत्तांत-लेखन कलेचीही महती जाणवते आहे, म्हणून येथे काहीशी : - विस्ताराने वृत्तांत लेखनकलेची मीमांसा केली आहे.. 回鮮