पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आ) एका ओळीत वाक्य लिहितांना शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयोग ( - ) है चिन्ह वापरतात. उदा : विद्या- पीठ परीक्षांसाठी केंद्रावर चौकशी करावी. ९) अपसारण ( > अ) बोलतांना विचारमालिका तुटल्यास अपसारण ( - ) हे चिन्ह वापरतात. उदा : नाटकातील संवाद : मी सर्व प्रयत्न केले, पण आ) काही स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यासही हे अपसारण चिन्ह 'स्पष्टीकरण चिन्ह' म्हणूनही योजितात. उदा : ती विद्यार्थिनी - जिने प्रथम पारितोषिक मिळविले, ती आपल्या महाविद्यालयात शिकत आहे. १०) कंस ( )- एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण किंवा खुलासा देण्यासाठी गोलाकार (...) किंवा चौकोनी [...] हे चिन्ह योजितात, उदा : बाजीप्रभूने ( शिवाजी महाराजांचा साथीदार ) विलक्षण पराक्रम गाजविला. ११) विग्रह चिन्ह ( - ) दोन शब्दातील किंवा वस्तूतील वेगळेपण दाखविण्यासाठी विग्रह (-) हे चिन्ह वापरतात, + उदा : अर्जुन धनुष्य-बाण घेऊन सज्ज झाला. २१