पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२) दंड चिन्ह ( | ) काव्यात पूर्णविरामाच्या ऐवजी दंड ( 1 ) हे चिन्ह वापरतात, उदा : महाराष्ट्र धर्म वाढवावा । १३) अवग्रह ( 5 ) एखाद्या स्वराचे उच्चारणातील दीर्घत्व दर्शविण्यासाठी अवग्रह ( 5 ) हे चिन्ह वापरतात. उदा : आई, अगाऽई, ओऽऽ, इत्यादी. 98) fea fea (... ...) वाक्यात गाळलेली जागा दर्शविण्यासाठी टिंब टिंब .) या चिन्हांचा उपयोग करतात. उदा : लालबहादूर शास्त्री भारताचे.. • होते. जुन्या मराठी भाषेत फारशी विरामचिन्हे योजिली जात नसत; पण इंग्रजी वाङमयाच्या संपर्कामुळे विरामचिन्हांच्या वापराला विशेष महत्त्व आले आहे. काव्यात तर या विरामचिन्हांना अर्थाच्या दृष्टीने अपरंपार महत्त्व कवींनी दिलेले आहे. तेव्हा आता मराठी शुद्धलेखनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून विराम- चिन्हांचा अभ्यास व्हायला हवा. त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. समारोप : शेवटी ' गाता गळा व लिहिंता हातवळा' हेच लक्षात ठेवले म्हणजे भाषा शुद्ध व चांगली लिहिणे ही सहज साध्य होणारी D २२