पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६) उद्गार चिन्ह (!) भावना व्यक्त करतांना ती दर्शविणान्या शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक (!) हे चिन्ह योजितात. उदा : अरेरे! तिचे वर्ष वाया गेले. शाबास! प्रथम पारितोषिक मिळविलेस. ७) अवतरण चिन्हे () व ("" ) अ) प्रत्यक्ष बोलणा-याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी अवतरण चिन्ह ( " ... " ) योजितात. उदा : ती म्हणाली, " मी नक्की पास होईन ". म्हणून उठाव “ आ) 'विशेषनाम' किंवा महत्त्वाचा शब्द देण्यासाठी अवतरण चिन्ह (... ) वापरतात. उदा : महाभारतातील 'एकलव्य'. खांडेकरांनी ' क्रौंचवध ' ८ 'ययाति' इत्यादी कादंबन्या लिहिल्या आहेत. मोठ्या प्रदीर्घ अवतरणासाठी साधारणपणे दुहेरी ; व अल्पाक्षर छोट्या रचनांसाठी एकेरी 92 अशी अवतरण देण्याची प्रथा आढळते. मात्र याबाबत नक्की नियम आढळत नाही. मुळात दुहेरी अवतरणाचीच प्रथा आहे. एकेरी अवतरण साधारणपणे एकेका शब्दास्तव योजिले जाते. ८) संयोग चिन्ह (-) i अ) दोन शब्द जोडतांना संयोग - चिन्ह (-): वापरतात. उदा : प्रेम-विवाह, ग्राहक- भांडार. २०