पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करताना 'राहा, पाहा, वाहा' यांच्याबरोबरच 'रहा, पहा, वहां ' ही रुपे वापरण्यास हरकत नाही. नियम १७ :-- ' इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावेत. ' अन् ' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. नियम १८ :- पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना -हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. मराठी साहित्य महामंडळाच्या शुद्धलेखनाच्या या १८ नियमांवरून पुढील महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे जाणवतात. १) मराठीतील लेखन हे शक्यतो उच्चारानुसारी असावे. . २) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. ३) व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. ४) नामांच्या व सर्वनामांच्या अनैकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा. ५) मूळ शब्दांतील अक्षरे यथोच्चार -हस्व किंवा दीर्घ लिहावीत, ६) न्हस्व 'इ' कारान्त व 'उ' कारान्त तत्सम शब्द वाक्यात दीर्घान्त लिहावेत. ७) विभक्तिप्रत्यय जोडताना अन्त्य म्हस्व स्वर दीर्घ होतो. ८) तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द समासात पूर्वपदी -हस्वान्तच लिहावेत. E९