पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९) अकारान्त तत्सम शब्दांतील उपान्त्य स्वर -हस्व 'इ' किंवा 'उ' असल्यास तो -हस्व लिहावा. १०) दीर्घोपान्त्य तत्सम शब्द दीर्घच लिहावेत. ११) व्यंजनान्त तत्सम शब्द अकारान्त लिहावेत. आपण लिहीत असतांना शब्दांच्या लेखनात अशुद्धता बरीच आढळते. याला कारण शुद्धलेखनाच्या अधिकृत (उपरोक्त ) नियमांविषयीचे अज्ञान हे असले तरी इतरही अनेक कारणे सांगता येतील. त्याचे सौदाहरण विवेचन पुढे दिले आहे. १) वर्णांचा क्रम बदलल्यामुळे होणाऱ्या चुका (शुद्ध रूपे कंसात दिली आहेत ). समात्प (समाप्त), शब्द (शब्द), चमत्कार ( चमत्कार ) २) संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका. अभिष्ट (अभीष्ट), अनावृत्त (अनावृत ), आशिर्वाद (आशीर्वाद ) ३) अयोग्य उच्चारामुळे होणाऱ्या चुका कल्यान (कल्याण). द्रुष्ट (दुष्ट), मानूस ( माणूस) ४) हिन्दी भाषेच्या संपर्कामुळे होणाऱ्या चुका. सफेद (सफेत ), दूसरा (दुसरा), ज्यादा (जादा) ५) विसर्गाच्या संभ्रमातून होणाऱ्या चुका. अंधःकार (अंधकार), अंतस्थ (अंतःस्थ ), मातोश्री (मातुःश्री) ६) इष्ट - इष्ठच्या संभ्रमातून होणान्या चुका. उत्कृष्ठ (उत्कृष्ट), कनिष्ट (कनिष्ठ), विशिष्ठ (विशिष्ट) प्र. १०