पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियम १२ :- एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे. उदा. - करण्यासाठी, फडक्यांना, पाहण्याला इत्यादी. एकारान्त सामान्यरूपे करू नयेत. पूर्वी एकारान्त शब्दप्रयोग करण्याच्या प्रघातानुसार ' आमचे घरी आपले मुलाबाळांसह अगत्य येणेचे करावे' असे लिहीत पण आता यांकारान्त रूपे वापरून ' आमंच्या घरी आपल्या मुलाबाळांसह अगत्य येण्याचे करावे (किंवा यावे ) ' असे लिहावे लागेल. 9 नियम १३ :- लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. एकारान्त नपुसकलिंगी शब्दांचे अकारान्त रूप योजावयाचे झाल्यास अशा अकारान्त रुपाच्या अन्ती अनुस्वार दिलाच पाहिजे. उदा. 'त्याचे व्याख्यान चांगले झाले' ऐवजी 'त्याचं व्याख्यान चांगलं झालं' वक्त्याच्या तोंडचेच उद्गार असे लिहावेत. इतर ठिकाणी असे लिहू नये. ' नियम १४ :- मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावेत. क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान इत्यादी. नियम १५ :- केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकर- पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे: तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह ) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमॉस अनुसरून छापावे. नियम १६ :- राहणे, पाहणे, वाहणे, अशी रूपे वापरावीत. रहाणे- राहाणे, पहावे - पाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग