पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदा. माहिती, हुतुतू, सुरू. अपवाद - नीति, भीति, रीति, कीर्ति इत्यादी तत्सम शब्द. (मात्र या शब्दांचा अन्त्य इकार आता दीर्घ (ई) होईल. ) नियम ७ :- अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार, उकार दीर्घ लिहावेत. उदा. गरीब, वकील, वीट, सून, वसूल. अपवाद : -हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द. उदा. गुण, विष, मधुर, प्रचुर, मंदिर, अद्भुत, अंकुश इ. नियम ८ :- उपान्त्य दीर्घ ई - ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार उकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हस्व लिहावा, उदा. गरिबास, वकिलांना, सुनेला, वसुलाची, नागपुरास, जिवाला. अपवाद :- दीर्घोपान्त्य तत्सम शब्द : उदा. शरीरास, गीतेत, सूत्रात, जीवास ( प्राणी या अर्थी). सामान्यतः तत्सम शब्दाच्या मूळ रुपात बदल करू नये. ३) किरकोळ नियम ९ :- पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदा. नागपूर, संबळपूर, तारापूर, वैजापूर, सोलापूर इत्यादी. 'पू' हे अक्षर दीर्घ लिहावे. नियम: १० :- कोणता, एखादा ही रुपे लिहावीत. कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत. नियम ११ :- हळूहळू. मुळूमुळे, खुटखुटू या शब्दांतील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहावा. G