पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'त्या' ही एकेकाळची शिष्टसंमत रूपे आज प्रचारात नाहीत. भाषेतील उच्चारणांशी शुद्धलेखन संबद्ध असल्याने कालपरत्वे उच्चारानुसार शुद्धलेखनही बदलतांना दिसते. व्याकरणातील शुद्धा- शुद्धतेचा शुद्धलेखनाशी जसा थोडा संबंध असतो तसाच भाषा शुद्धीचाही शुद्धलेखनाशी थोडाच संबंध असतो. भाषाशुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलेल्यांना परभाषेतील शब्द टाळावेत असे वाटेल, पण शुद्धलेखनाचा या गोष्टींशी फारसा संबंधच येणार नाही. फार तर अशा शब्दातील -हस्व-दीर्घ काटेकोर नियमांमध्ये बसविता येत नाहीत या गोष्टी पुरताच येईल. उदा. :- ' कुडता' हा शब्द वापरावा की विदेशी म्हणून टाळावा हा विवेक भाषाशुध्दी प्रकरणात येईल. शुध्दलेखनाचा संबंध एवढाच की यातील 'क' चा उकार कोणता असावा. तेव्हा शुध्दलेखन हे प्रामुख्याने लेखनातील शुध्दता दाखविण्यासाठी असते. म्हणूनच व्याकरणकार मोने यांनी • शुध्दलेखन' या ऐवजी 'लेखन- शुध्दी' प्रकरणं लिहिले आहे. उच्चारणांशी लेखनशुध्दीचा संबंध त्यांनी मानला आहे. 4 मो. कै. दामले या व्याकरणकारांच्या दृष्टीने बोलणेच लेखनानुसारी असावे, कारण लेखन - स्वरूपात अधिक सुव्यवस्था निश्चिती व सफाई असते. 'आधी बोलले गेले व मगच ते लेखनविष्ठ झाले' हाच सिध्दांत शुध्दलेखनात उच्चारानुसारी लेखन मानण्याच्या प्रक्रियेत पाळला गेलेला दिसतो. म्हणून मो. के. दामले यांचे " एकंदरीत भाषासंग्रह, स्पष्टीकरण व सामान्य नियमांचे आविष्करण हो वैयाकरणाची मूळ कर्तव्ये होत. भाषेचे नियमन किंवा बंधन म्हणजे अपवादक गोष्टीस सामान्य नियमांचेच वळण देणे हा अव्यापारेषु व्यापार होय" (पृ. ७८) है मत स्वीकारता येत नाही. कारण लेखनातील . ३