पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुध्दाशुध्दता ठरवितांना सामान्य लोकांचे उच्चारण हाच एकमेव प्रमुख आधार आहे. डॉ. लीला गोविलकरांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे मराठी लेखनातील हा शुध्दाशुध्दतेचा विवेक करण्यासाठी पुढील सहा प्रमुख साधनांचा विचार करावा लागतो. १) उच्चार २) व्युत्पत्ती ३) लोकव्यवहार किंवा प्रचार ४) लोकपरंपरा किंवा त्यां उच्चाराचा इतिहास ५) लोकव्यवहार व परंपरा या मधून व्यक्त झालेली त्या विशिष्ट भाषेतील प्रवृत्ती ६) सोय किंवा सोपेपणा. एखाद्या ठराविक शब्दाचा उच्चार कसा केला जातो ? त्यातील विविध लकबी कोणत्या ? त्या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय असू शकेल ? तो शब्द आज कसा लिहिला जातो ? पूर्वी कसा लिहिला जात होता ? भाषेच्या प्रवृत्तीशी तो शब्द मिळता-जुळता आहे की नाही ? त्याच्या लेखनात सुलभतेऐवजी अकारण बोजडपणा, क्लिष्टता आहे काय ? या सर्वच दृष्टीने शब्दांचा विचार करून मगच त्यांचे लेखन ठरत असते. शुद्धलेखनाची नियमावली मराठी शुध्दलेखनाच्या संदर्भात प्रामुख्याने हस्व-दीर्घ, अनुस्वार, शिवाय अन्य काही गोष्टी यांचा विचार करावा लागतो. त्यासाठी मराठी महामंडळाने तयार केलेल्या शुध्दलेखन नियमांचा आधार अधिकृत म्हणून घेणे आवश्यक आहे. ते नियम सोदाहरण 'समजावून घेणे आवश्यक आहे. शिवाय अपवाद मानले गेलेले • शब्दही स्वतंत्रपणे लक्षात घेतले पाहिजेत. दि. २० सप्टेंबर, १९६२ रोजी शासनाने एका ठरावाने मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कारलेल्या शुध्दलेखन विषयक