पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नसते. अनेकदा अनवधानाने व सवयीने आपण चुकीचेच शब्द लिहीत असतो. पण शेवटी चूक ही चूकच ! म्हणून वेळच्या वेळी, निदान योग्य वेळी, तत्परतेने, प्रामाणिकपणे लेखनातील शुद्धाशुद्ध विवेक करायला हवा. साधारणपणे आपल्या कोणकोणत्या शब्द- लेखनाच्या संदर्भात चुका होतात ते लक्षात घेऊन अशा शब्दांची स्वतंत्र शुद्ध व अशुद्ध रुपे येथे नमूद करावयाची आहेत. शुद्ध- लेखनातील जुन्या, नव्या नियमांबाबतच्या संभ्रमातून हे घडत नाही. अनेकदा पुस्तकांना जोडलेल्या शुद्धिपत्रातूनही या चुका का होतात यांची कल्पना आपल्याला येऊ शकते. लेखन मग ते कच्चे असो की पक्के ते काळजीपूर्वक सावधानतेने शुध्दच करायला हवे म्हणजे या लेखनदोषांना सामोरे जावे लागत नाही. शुद्धलेखन म्हणजे काय ? 'मराठी भाषेने देवनागरी लिपीचा स्वीकार केला आहे. देवनागरीमध्ये मराठी शब्द किती प्रमाणात उच्चाराशी प्रामाणिक राहतात याचा विचार म्हणजे मराठीच्या शुद्धलेखनाचा विचार होय' असे डॉ. लीला गोविलकर यांनी 'मराठीचे व्याकरण' या ग्रंथात प्रतिपादन केले आहे (पृ. २२३ ) शुद्धलेखन हे प्रामुख्याने वर्ण व वर्णमाला यांच्याशी निगडित असते. भाषेतील निधी म्हणजे शब्दांचा कोश व विधी म्हणजे भाषेतील व्यवहार, व्यवस्था कालांतराने सतत बदलत राहते. भाषाशास्त्रीय दृष्टीने तर हे होणे अपरिहार्य व बरोबरच आहे पण भाषेबरोबरच भाषेचे शुद्ध- लेखनही सतत बदलत जाते. व्याकरणाने भाषेच्या, शब्दांच्या ज्या रुपाला मान्यता दिली व जी रूपे भाषिक व्यवहारात रुढ आहेत, तीच रूपे, त्यांचेच लेखन आपण शुद्ध मानतो; उदा. :- 6 म्या