पान:मयाची माया.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. शिरीन, तूं ह्मणतेस तसे असेल; , पण त्याचा माझ्याशी संबंध कसा येतो हे मात्र मला समजत नाहीं ! 'तुझ्यासाठी, प्रसंग पडला तर मी आपला प्रांण देण्याला सुद्धां मागं पुढे पाहणार नाहीं असं मी तुला बचन दिलं आहे; पण ते माझ्या हातून पाळलं गेलं नाहीं, तूं केलेल्या परिक्षेत मी तुझ्या • मनाप्रमाणं उतरलों नाहीं असं सिद्ध केल्यावांचून तुझं झणणं मला कसं बरं पटेल ? " 66 66 काय ! " तिनें तिरस्कारसूचक आवाजाने मला प्रश्न केला, " तुझी देखील इतर पुरुषाप्रमाणंच आहां असं मी सिद्ध करून देऊं होय ? अंः त्यांत काय आहे ?" " त्यांत कांहीं नसेल. पण ती गोष्ट माझ्या प्रत्ययाला आल्यावांचून ती खरी आहे; माझ्याबद्दलचं तुझं मत बरोबर आहे असं मीं काय ह्मणून ' समजावं ? शिरीन, माझी परीक्षाच पहायची आणखी मा दिलेलं वचन कोणी कडून तरी माझ्याकडून खोटं करवायचं येवढ्याच साठी जर तूं मला अशक्य गोष्ट करायला सांगितलीस, आणखी ती माझ्या हातून वेळेला झाली नाही तर आतापर्यंत केवळ तुझ्या प्रेमासाठीं ह्मणूनच, दुसऱ्या कोणत्याही इष्ट अनिष्ट, बन्यावाईट गोष्टींचा यत्किंचितही विचार न करतां हव्या त्या अडचणी सोसून, हवा तो त्रास सोसन, दोन तीन दिवसच कां होईना, पण अगदी तझ्या मर्जीनुरूप जो भी वागलों त्यांचा एकंदरीनं कांहींच उपयोग झाला नाही असंच म्हणायचं की काय ? छे, तसं मी कां म्हणेन पण ! जोपर्यंत एखादी विरुद्ध गोष्ट माझ्या अनुनवाला अली नाही तोपर्यंत तुमचं प्रेम इतर परुषांच्या प्रेमापेक्षा अधिक उत्तम आहे असं मी हवं तर म्हणेन ! पण मघाशी तुझी तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या मर्जीसाठी मी अमक्या रीतीनं वागलो असं जें तुझी ह्मणाला त्याचा अर्थ काय ? उघड बोलायचं ह्मणजे तुली जे माझ्या येवढे भजनी लागला आहां ते स्वार्थासाठी नाहीं तर तुमच्या मनांतला कांहीँएक विशेष हेतू साधण्यासाठी माझ्यासारख्या सुस्वरूप भोळ्या भावढ्या तरुण स्त्रीला हवीं तशीं वचनें देऊन शेवटीं फसवि- ण्यासाठीच नव्हे तर काय ? पण माझ्यासाठी ह्मणून तुझी अशी कोणती " .