पान:मयाची माया.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. दिलन् तर मग पुढे मी काय करायचं ! तुमच्या कोरड्या प्रेमाला आणखी वायफळ वचनाला घेऊन माझा थोडाच निभाव लागणार आहे. " मी तुझ्यासाठी तूं सांगशील ते करीन. प्रत्यक्ष आपला प्राणसुद्धां देईन' असं तोंडानं नुसतं ह्मणणं सोपं असतं आणखी तेवढचानंच माझ्या सारख्या भोळ्याभाबड्या अज्ञान अचला फसून जातात. पण पुरुषांचे कावे, त्यांचा स्वार्थ, आणखी तो साधण्यासाठी तेवढ्या वेळापुरती त्यांनीं केलेली हवीतशी बडबड कांहीं आह्मा गरीब बायकांच्या लक्षांत येत नाहीं. आणखी शेवटी बिचाऱ्या कावेबाज पुरुषांच्या मोहांत सांपडून "त्या फसतात ! " ५ हे तिचे बोलणें मला बरेंच अवास्तव वाटले; कारण त्यावेळेपर्यंत तिनें सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्यास मी चुकलों नव्हतो. तिच्या मर्जी- प्रमाणे वागण्यासाठी मी आपल्या प्रिय मित्राची व कित्येक वर्षे ज्यांच्याशी आमची देवघेव चाललेली होती आणि जे मला पूज्य वाटत असत अशा त्या नंदशंकर शेटजींची किंवा दुसऱ्या कोणाचीही पर्वा चाळगली नव्हती. शिरीनच्या व आपल्या प्रेमाच्या आड कोणीही आले, कितीही अडचणी उत्पन्न झाल्या तरी माघार ह्मणून घ्यावयाची नाहीं असे ठरवून त्याप्रमाणें मी वागत होतों ! या बाबतींत मी माझ्या धर्माकडे, माझ्या सदसद्विवेकबुद्धीकडे किंवा अशा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाहीं ! किंवा तिच्या प्रेमापुढे मला कोणत्याही गोष्टीचें महत्व वाटलें नाहीं. माझ्या धर्माने अपेयपान व अभक्ष्य- भक्षण निंय मानून त्याचा निषेध केलेला असला, दुसऱ्याच्या स्त्रीला चश करणे ही अत्यंत अनीतिमूलक व पापमूलक गोष्ट आहे असे जरी माझें मन मला वारंवार सांगत होतें तरी मीं सर्व प्रकारच्या उपदे- शाकडे-मीं ठरविलेल्या विचाराशीं व वर्तनाशीं विरोधी अशा वाटणाऱ्या उपदेश | कडे-- जाणून बुजून डोळेझांक केली होती; व शिरीनची आज्ञा हीच वेदवाक्य मानून त्याप्रमाणे वागत आलो होतो ! आतांपर्यंत शिरीननें केलेली आज्ञा मी शिरसावंद्य मानन चाललो होतो ! तरी आपल्या विरुद्ध यत्किंचितही पुरावा नसतांना शिरीन आपल्याला असे टोचून कां 'बरें बोलली असे वाटून मला तिच' थोडासा राग आला, व मी ह्मणालों, —