पान:मयाची माया.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. ९४ माझ्या तावडींत सांपडला असतां तर या दुनियेतून त्याला नाहींसह करायलाही- - पण तूं सांगितलं असतंस तरच अं-मीं कमी केलं नसतं ! एकंदरीनं त्याचा त्रास नाहींसा झाला ह्मणूनच प्यारी, तुझ्या एकांताचा हा अप्रतिम लाभ मला आज मिळतो आहे किंवा यापुढे रोज मिळणार असं मी समजतों ! 59 14 “ ते सारं खरं; पण मी सांगितलेली गोष्ट जर तुझी केली नसती- आज तुझी ती केली नाहीं असं मला मुळींच वाटत नाहीं तर उयां माझ्यावर कोणता प्रसंग आला असतां हें तुलाला ठाऊक तरी आहे. कां ! खरोखरी पाहिलं तर मेली माझी ती कंकणं ती काय आणखी विलायतेला जाऊन शिकून येण्यासाठी मी तीं तुम्हाला दिलीं ह्मणून तेवढ्यानं आईचं काय बिघडत होतं ! पण गडे, आईचा तो हड्डी स्वभाव पाहून कींनाई मला तिचा भारी राग आला आहे ! तसंच दुसरं पांचों रुपयांचं प्रकरण ! काय मेलं येवढ्याशा गोष्टीचा जसा कांहीं ग्रंथ झाला आहे. पांचशे रुपड्यांची कथा ती काय आणखी माझ्या हातून ते हरवले · झणून माझी आई इतकी रागावते ती काय ! काय मेलं कालपासून की नाई सगळंच आपलं विपरीत होऊं लागलं आहे. पण त्यांतल्या त्यांत माझ्यावरचं आपलं प्रेम कमी झालं नाहीं येवढीच काय ती दुःखांत सुखाची गोष्ट म्हणायची झालं दुसरं काय ? ” 66 हे तिचें बोलणे ऐकून मी आनंदच्या अगदी ऐन भरांत आलों; व तिची स्तुति करून तिला चढवावी अशा हेतूनें ह्मणालों पण प्यारी, तुझं माझ्यावर एकदां जडलेलं प्रेम अजन कायम आहे ही गोष्ट तूं साधारणच समजतेस की काय ? अग, अतीशय सुंदर ह्मणून नांवा- . जलेल्या कांहीं बायकांचें खरे प्रेम एकाच ठिकाणी नेहमीं सहसा रहात नाहीं असं कित्येक लोक ह्मणतात; पण माझा आतांपर्यंतचा अनुभव तरी निदान त्यांच्या विरुद्ध आहे ! " " हे आपलं तुमचं कांहीं तरी झणगं आहे झालं ! पण मग खरंच कां यावेळीं तुझी तीं माझी कंकणं आणखी पांचशे रुपये माझ्यासाठी आणले आहेत ? जर हॅ काम माझ्यासाठी तुझी केलं नसलं तर उद्यां मात्र • माझी कांहीं धडगत नाहीं ! समजा, आईनं मला उग्रां घरांतून घालवून