पान:मयाची माया.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. बरीचशी व्हिस्की ओतून त्यामध्ये सोड्याची एक बाटली रिकामी केला; आणि एक ग्लास एका हातानें माझ्यापुढें धरून दुसरा तिर्ने आपल्या तोंडापाशी नेला. हें पाहतांच आतां मी कोणत्याही प्रकारचा आग्रह करून न घेतां तिनें माझ्यापढें धरिलेला ग्लास हातात घेऊन त्यामध्ये असलेली मदिरा आनंदानं पिऊं लागलों; व तिनेंही ताबडतोब माझ अनुकरण केलें ! मदिरेच्या अमलानं मला एक रात्र व एक दिवसभर इतका असह्य त्रास सोसावा लागला असतांनाही या वेळीं शिरीननें एकांतांत मोठ्या प्रेमानें मला अर्पण केलेल्या मंदिरेचा आव्हर करण्याचे माझ्या एकवेळही मनांत आले नाहीं; कारण थोड्याच वेळांत भोगावयाच्या अनेक प्रकारच्या सुआरंभी मदिरा न घेतल्यास तेव्हांच कंटाळा येतो; सुखाम- धील गोडी थोड्याच वेळांत नाहींशी होते असे तिनें नुकतेच मला सांगि- तलें होतें; व या तिच्या सांगण्याचा अनुभव घेण्याची संधी सुदैवानें त्यावेळी आल्यावर तिच्या ह्मणण्याप्रमाणे वागण्यांत मीं बिलकुल कसुर केली नाहीं ! त्यांतूनही शिरीन आज आपल्याला एकटी भेटली या गोष्टीच्या आनंदानें तर माझे मन नांचं लागले ! मदिरा प्राशन झाल्यानंतर शिरीन माझ्या अगदी जवळ आली व माझा हात आपल्या दोन्ही हातांत घेऊन ती अत्यंत लडिवाळपणानें ह्मणाली, “ पिरोज, यावेळी मला किती आनंद झाला आहे ह्मणून सांगूं ! मला बाई अगदी मनापासून वाटतं कीं, रोजच्या रोज तुझ्याशी असं एकसारखं आपलं हंसत खेळत मजा करीत रहावं ! पण बाई तसं कुठून घडायला ? " 66 " कां न घडायला काय झालं?" मी मोठ्या ऐटीने झणालों. “आतां आपल्या मार्गत अडचण अशी मुळींच उरलेली नाहीं. येऊन जाऊन आपल्याला त्या लबाड, ढांगी माणसाची --आतां आपल्याला बिलकुल भीति उरलेली नाही. एकंदरीत त्याच्या त्या लंगड्या पायानं त्याची चांगली खोड मोडली ह्मणायची ? आतां येशील कां ह्मणावं मधे मधें लडबुडथला ! आपण बंदरावरून आठों त्या रात्री त्या गुलामानं कसा एकसारखा अपला अगदा पिच्छा पुरविला होता ! पण परभारें चोरां- नींच पाय मोडला ह्मणून ठीक झालं; नुसत्या पायावर तरी निभावलं;