पान:मयाची माया.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. बसून निवालों; व सुमारे पंधरा वीस मिनिटांच्या आंतच ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोंचलों. ९२ त्यावेळी शिरीन हँर्निंगगार्डन मधल्या ठरलेल्या जागीं माझी वाट पहात एकटीच बसली आहे असे मला दिसले ! तिला एकटीला तेथे पाहतांच मला जो कांहीं आनंद झाला त्याचें वर्णन करणे कठीण आहे तो समय मला इतका कांहीं आल्हादकारक वाटला की, नंदनवन ह्मणतात तें हँच असले पाहिजे असे साझें वेडे मन मला सांगू लागलें ! आहाहा ! तें स्वच्छ चांदणे, ती बागेची रमणीय शोभा, ती मंदमंद वाहणाऱ्या वाऱ्याची झुळुक आणि वनदेवीनें माझ्यासाठी ह्मणून निर्माण केलेली ती मंदस्तित करीत करीत नुकती विकसित होत चाललेली लाव- ण्यपूर्ण कालिका - माझी प्रिय शिरीन- दृष्टीस पडतांच माझा आनंद गगनांत मावेनासा झाला ! आतांपर्यंत ज्या ज्या वेळीं शिरीनची व माझी गांठ पडली होती त्या त्या वेळी माझा शत्रु, तो पिरोज बहुधा तिच्या बरोबरच कोठें तरी असे; पण या वेळेला मात्र तो कोठेंच दिसला नाहीं; त्यावरून त्याच्या लंगडचा पायानें शेवटीं त्याला दगा दिला अशी कल्पना मनांत येऊन मला त्या गोष्टीबद्दल अतोनात समाधान वाटले ! मला पाहतांच शिरीन चटकन लाजून उभी राहिली; व लडिवाळप - जानें माझा हात धरून तिने मला बाकावर बसविलें आणि ती माझ्या जवळ बसली व ह्मणाली " तुझा पाय आतां अगदी चागला झाल्याचं पाहून मला इतका कांहीं आनंद झाला आहे कीं, सागता येत नाहीं. आणखी हैं ठिकाण तरी किती मजेचं, आनंदाचं आहे ! अशा या 'आनंदाच्या ठिकाणी आपण अगोदर शराब अठबत घेतलीच पाहिजे. कारण त्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्यें - कोणत्याही सुखामध्ये, आनंदा- मध्ये - खरी मजा उत्पन्न होत नाहीं. शराब घेतली नाहीं ह्मणजे कोणत्याही सुवाचा तेव्हांच अगदी थोड्या वेळांत कंटाळा येऊन जातो ! " ● असें ह्मणून तिनं व्हिस्कीची एक बाटली, दोन ग्लॉस व सोड्याच्या दोन बाटल्या आपल्या हँडबॅगमधून बाहेर काढल्या व दोन्ही ग्लासांत