पान:मयाची माया.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ९९ दिसलीं; व शेटजींनी केलेल्या वर्णनाबरहुकुम त्याही पेटीतील कंकर्णे आहेत असे माझ्या दृष्टोत्पत्तीस आलें. हे पाहून मी एकदम चपापलों; मी बराच वेळ विचार करून पाहिला; पण ही अघटित घटना कशी घड़न आली याबद्दल मला कांहींच कल्पना करवेना ! शेवटी या गोष्टीचा तपास परत आल्यावर करावयाचा अर्से ठरविले व ती पेटी बाहेर काढून ट्रंक बंद करितों तो बाहेर मला कोणी तरी हाँक मारीत आहे असं एका गड्यानें येऊन सांगितलें; ह्मणून कोण आले आहे हे पाह ण्यासाठी मी पेटी व नोटा घेऊन माडीवरून खाली उतरलों !. प्रसंग ११ वा.. 6. मी माडीवरून खाली आलो तेव्हां अजमार्से साडेसहा होऊन गेले असावेत. दाराबाहेर येऊन पाहतों तो एक व्हिक्टोरिया उभी असून गांडी- वाला भगवानदास शेट, ओ पिरोजशेट" अशा माझ्या नांवानें- माझ्या दोन्हीं नांवानें- हांका मारीत असल्याचे पाहून मला फार आश्चर्य वाटले. मी पिरोजशेट असे याला कोणी सांगितले असावें है मला समजेना ! पण त्यावेळी मी या गोष्टीचा फारसा विचार करण्यांत वेळ घालविला नाहीं. " अहो मला दारांतून बाहेर येतांना पाहतांच गाडीवाला ह्मणाला पिरोजशेट, शिरीनचाई नुकत्याच पुढे गेल्या आहेत आणखी तुझाला लवकर घेऊन येण्याबद्दल त्यांनी मला सांगितलं आहे ! " नंदशंकर शेटजींचे दोन गडी दरवाजाच्या बाहेरल्या बाजूला उभे होते; व गाडीवाल्यानें उच्चारलेले वाक्य ऐकतांच ते एकदम एकमेकांकडे पाहून मोठमोठ्याने हंसूं लागले ! ज्यानें शिरीनचे पहिले पत्र मला दिले तो गडी तेथेच होता. त्याच्या ध्यानांत ही सर्व हकीकत येऊन त्याने ती दुसऱ्याला सांगितली असेल - किंबहुना उडत उडत ती मालकाच्याही कानापर्यंत कदाचित् जाऊन पोचली असेल-अशी मला शंका आली, पण तिकडे बिलकुल लक्ष न देतां मी लागलीच मोठ्या गर्दीने माडींत