पान:मयाची माया.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० वा. " " शेटजी असू द्या आतां " आमचे शेटजी त्यांना धीर देऊन ह्मणाले, “ गोष्ट होऊन चुकल्यावर दुःख करून कांहीं उपयोग नाहीं. बरं शेटजीं, तुमची ती पेटी ओळखण्यासारखी आहे कां ? " " अहो ओळखण्यासारखी झणजे ! तिच्यावर वरल्या बाजूला झांक- णाच्या आंत आणखी दोन्ही बाजूवर आपल्या त्या साहेबांच्या नांवाची एम. एस. अशी अक्षरें इंग्रजीत खोदविली आहेत !" “ बरं या गोष्टीला किती दिवस झाले ? तुझी पोलीसला लागलीच कळविलं कीं नाहीं ? " हो; पेटी नाहींशी झाली व तो पोरगाही निघून गेला असं लक्षांत येतांच त्याप्रमाणे मी लागलीच सर्व हकीकत पोलीसला कळविली; आणि त्या नव्या गड्याचं नांव चेहरेपट्टी वगैरे सांगून आमचा त्याच्यावर चहीम आहे असं सांगितलं आहे. आणखी याला कांहीं फारसे दिवस झाले नाहींत; आजचा तिसराच दिवस - हो, आज शुक्रवार ना; तर गेल्या मंगळवारची ही गोष्ट. " , 66 समजा; तर मग शेटजी, तुमचे जिन्नस कुठे जात नाहींत असं तुझी पक्कं आणखी या बाबतींत आमच्याकडून होईल तेवढी खटपट, हवं त्याप्रकारची मदत करण्याचं आह्मी तुझाला वचन देतों आतां या गोष्टीबद्दल तुझाला मुळींच काळजी करण्याचं कारण नाहीं. " याप्रमाणे दोघांचा बराच वेळ संवाद झाल्यावर लागलीच ते बाहेर गेले. ते बाहेर केव्हां जातात याचीच मी वाट पहात होतों; कारण मलाही आपल्या कामाला जायचें होतें. ह्मणून मीं लागलीच आपली ट्रंक उघ- डली व नोटा काढल्या. कहानजीसेंट ज्या गोष्टीबद्दल नुकतेच आमच्या शेटजीशीं बोलत होते ती चमत्कारिक गोष्ट माझ्या मनांत घोळत होती; व मी ट्रंक उवडतांच आंत ठेवलेल्या शिरीनंच्या पेंटीकडे माझें साहजी- करीतीनं लक्ष्य गेलें; आणि ती पेटी आपल्या हातांत घेऊन मी पाहूं लागलों तो काय चमत्कार झाला असेल तो असो; पण तिजवर देखील तींच दोन अक्षरें खोदलेली आहेत असे मला आढळून आले झणून मी लागलींच ती पेटी उबडून पाहिली तो शेटजीच्या ह्मणण्याप्रमाणें तिच्या आतल्या बाजूलाही एम. एस हाँ दोन इंग्रजी अक्षरें कोरलेली मला