पान:मयाची माया.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ८९ शेवटी मोठा धीर करून त्या रत्नपारख्याला विचारले " शेटजी, हे कंकण पाहतांच आपली एकाएकी अशी स्थिति कां बरं झाली ? आपल्याला कोणत्या गोष्टीमुळं इतकं दुःख होत आहे हे आम्हाला आपण सांगाल काय ? ". 'शेटजी, ' " कहानजीशेट दुःखाचा दीर्घ श्वास टाकून कापन्या आवाजानं झगाले, " काय सांगावें, धंद्यांत जर अशी ठोकर बसली तर आमचा निभाव कसा लागावा ! अहो, याच कंकणाच्या घाटाची, पण किंमतीनं याहून हलक्या प्रतीची कंकणाची जोडी मी आमच्या त्या..... साहेबांनी सांगितल्यावरून त्यांच्या मेमसाहेबांच्या हातांत चरोबर बसेंल आणखी चांगली शोभेल अशी मुद्दान तयार करविली होती; पण आमचं दैव आडवं आलं त्याला काय करणार ! " 66 ह्मणजे ? " आश्वर्ययुक्त मद्रा करून नंदशंकरशेटजींनीं विचारलें, " साहेबांनीं शेवटीं तीं घेण्याचं नाकारलं कीं काय ? " 66 छे हो. नाकारतात कशाचे ! तसं झालं असतं तरी मला त्याचं कांहीं वाटलं नसतं. कारण, ती पाहिजे तशी खपली असती, पण – " इतकें बोलतांच पुन्हा त्यांचे डोळे भरून आले व उपरण्याने डोळे पुशीत घोगण्या आवाजाने ते पुढे ह्मणाले " पण तीं कंकणं त्याच्यासाठी मुद्दाम करविलेल्या एका सुंदरशा पेटींत. घालून ठेविली होती. ती पेटी लहानशी येवढी ( असें ह्मणतांना त्यांनी आपल्या हाताच्या बोटानी पेटीचे मोजमाप दाखविलें ) होती. ती मी नेहमीं आपल्या बसण्याच्या गादीशेजारी ठेवीत असे; व दुकानांतून घरी जातांना ती सेफमध्ये घालन सेफला कुलूप लावून मी जात असे; पण एकेदिवशीं कामाच्या धांदलीमुळं ती पेटी सेफमध्ये ठेवण्याचं मी विसरलों; आणखी या गोष्टीची, दुसरंकिंमतवान जवाहिर खरेदी कर- ण्याच्या नादांत मला मुळींच आठवण झाली नाहीं ! पेटी नाहींशी होण्याच्या आदल्याच दिवशीं आझी एक तरणा गोरटेला रासरी वीस बावीस वर्षांच्या वयाचा नवीन गडी चाकरीला ठेविला होता; आणखी त्या हरामखोरानं पाळद राखून ती पेटी लांबविली. तेव्हांपासून त्या गड्याचा व त्या पेटीचा बिलकुल पत्ता नाहीं ! " १२