पान:मयाची माया.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० वा. जीनीं पुन्हा हंसून प्रश्न केला; व माझ्याकडून त्याचे उत्तर मिळण्या- पूर्वीच ते आपल्या निजावयाच्या जागी निघून गेले ! 2 शेटजीकडून मला हवे होते तेवढे पैसे हातीं येतांच मला समाधान चाटले. शिरीननं दिलेली दागिन्यांची पेटी आणि त्या नोटा मी आपल्या ट्रंकमध्ये ठेविल्या व आनंदानें निजलों. दुसरे दिवशी तिसरप्रहरी - चार वाजण्याच्या सुमारास आह्मी चहा घेत असतां - शटजी व मी एकाच ठिकाणी चहा घ्यावयाला बसलों होतों--शेटजींच्याकडे त्यांच्या परिचयाचे कोणी गृहस्थ आले. बराच वेळ त्यांच्या दोघांमध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी चालल्या होत्या. इत- क्यांत, नंदशंकर शेटजीनीं लिमडीहून परत येतांना तेथल्या मोडकळीला आलेल्या एका श्रीमंत गृहस्थाच्या कडून मुंबईचा बाजार दाखविण्यासाठी एक हिस्याचे कंकण ( वरील भागावर हिरे बसविलेलें ) आणलेलें होतें ते त्या गृहस्थांना दाखवून त्यांना विचारले " कहानजी शेट, ( हे गृहस्थ मुंबई शहरांतील एक नामांकित रत्नपारखी होते ) आपण या कंकणाची किंमत किती कराल ? "9 ८८ . कहानजीशेट तें कंकण हातांत घेऊन पाहूं लागले व म्हणाले, अशा जिनसाची किंमत ताबडतोब करितां येणं कठीण आहे. मी हैं कंकण पुन्हा एखायावेळीं स्वस्थपणानं पाहून मग त्याबद्दल काय ते सांगेन. " इतके बोलून कहानजीशट कांहीवेळ स्तब्ध झाले; व एकाएकी त्यांच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले ! हा काय चमत्कार आहे हे आम्हाला काही केल्या समजेना ! कहानजी- शेट, कसल्या तरी गोष्टीची आठवण झाल्यामुळे आतां अतोनात कष्टी होऊन गेले होते. त्यांची चर्या एकदम दुःखानें व संतापानें अगदी लाल होऊन गेली व त्यांचा गळा दाटून आल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द निघेना. हे पाहतांच आह्मी दोघेजण अगदी गोंधळून गेलों ! हा काय एकदम चमत्कार झाला याचा आझाला दोघांना कांहींच उमज पडेना ! याप्रमाणे आह्मी दोघे एकमेकांच्या तोंडाकडे वेड्याप्रमाणे पहात राहिलों. काय बोलावें हें कोणालाच सुचेना ! अशा स्थितीत अंजमार्से पांच मिनिटें गेल्यावर नंदशंकर शेटजीनीं 66