पान:मयाची माया.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. वाटतं काय ? छे! तसं कांहीं वाटत असेल तर ते अगदीं खोटं आहे. तुझीं ज्या- .ला पैसे देऊ केले आहेत त्या मनुष्याची चांगली सचोटी, व्यवहार, ओळख वगैरे गोष्टींचा तपास केल्याशिवाय तुझी त्याला पैसे देऊं, नका; येवढं माझं तुलाला सांगणं आहे. पण तो गृहस्थ जर तुमच्या चांगला: माहि- तीचा असेल तर माझं मुळींच काहीं झणणं नाहीं. " 66 माझ्या चांगल्या माहितीचा 9" मी किंचित् रागाचा आविर्भाव आणून ह्मणालों. “ शेटजी, त्याच्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र.. सहसा मिळणार नाहीं. निदान मला तेरी आजपर्यंत कांहीं तसला दुसरा मनुष्य - सर्व तऱ्हेनं विश्वास ठेवण्याला योग्य असा- पहायला देखील सांपडला नाहीं. शेटजी, असलीं खरी खरी चांगली माणसं जगांत फार दुर्मिळ असतात. तेव्हा माझ्या त्या मित्राबद्दल मला कधीं काडीचीही शंका येणार नाहीं व आपण निदान त्याच्यासंबंधानं तरी असं भलतंच कांहीं मनांत आणूं नये. " 66 ८७ भगवानदास, " माझ्या हातांत त्या पांच नोटा देऊन ते किंचित् दिलगिरी व्यक्त करण्याच्या हेतूने म्हणाले, “ मी तुमच्या मित्रांबद्दल मुळींच कांहीं बाललों नाहीं; हल्लींच्या लोकांशी फार सावधगिरीनें वागलं पाहिजे असं मीं तुम्हाला नुसतं मोघम सांगितलं हं ते ठेवा पांचशें रुपये नीट; आणखी उद्यां आपल्या मित्राची गरज भागवा. बरं तर आतां बरीच रात्र झाली आहे आणखी तुझीही साऱ्या दिवसभर हिंड- ण्यानं दमून गेला असाल तेव्हां आतां स्वस्थ निजा " इतके बोलू शेटजी जरा स्तब्ध राहिले व किंचित हंसून पुढे म्हणाले " हो, पण बरी आठवण झाली; आज सकाळी तुम्ही जे एकदां घरून गेलांत ते जेवायला कांहीं परत आला नाहीं असं मला समजलं. मला वाटतं तुमच्या त्या मित्रानेंच – सकाळीं तुम्हाला पत्र आलं होतं त्यानेंच - तुम्हाला जेवायला बोलावलं होतं नाहीं ? " 66 होय; त्याच्याचकडे मी आज गेलों होतों. " मी विचार न करितां एकदम बोलून गेलों. " आणखी तोच गृहस्थ सध्यां संकटांत पडला आहेना ? " शेट-: