Jump to content

पान:मयाची माया.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ प्रसंग १० वा. कठीण आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटांत न सांपडतां किंवा कोणतेही दुष्ट कर्म हातून होऊं न देतां एकदा आपले आयुष्य लोटलें ह्मणजे मिळविली असं मी समजतों " नंदशंकर शेटजीनी हल्लींच्या लोकांवर इतका ताशेरा कां झाडावा है मला समजले नाहीं; पण त्यांच्या बन्याच व्यवहारांत ते गाफलपणाने वागल्यामुळे शेटजी फसले गेले असावें असें त्यांच्या बोलण्याच्या एकंदर रोखावरून मी अनुमान केलें ! शेटजी फसले असले तरी मला त्यांच्या पांचशे रुपयावांचून त्यांच्याशी सध्यां कांही एक कर्तव्य नव्हते. माझे मन त्यावेळी स्वस्थ असते व तशा स्थितीत शेटजीनी लोकांवर केलेली टीका माझ्या कानी पडती तर कदाचित् त्यांच्या बोलण्याचा मी विचार केला असता; पण आपण हाती घेतलेल्या कामांत एखादा लबाड मनुष्य आपल्याला भेटल्यामुळे शेटजींच्या ह्मणण्या- प्रमाणे आपलें कांहीं नुकसान होण्याचा संभव आहे कीं, काय या गोष्टीचा मी बराचवेळ विचार करून पाहिला; व आपल्या या व्यवहा आपल्याला त्या पिरोजवांचून कोणाचीही भीती वाटण्याचे कारण नाहीं अशी. मला खात्री वाटली. बरें, त्या पिरोजची भीती तरी तो लबाड किंवा फसच्या म्हणून नव्हे तर तो आपला शत्रु, शिरीनच्या व माझ्या प्रेमांत विघ्न आणणारा दुरात्मा ह्मणूनच त्याची थोडीशी धास्ती मला वाटत होती; पण तीही तो लंगडा झाल्यापासून जवळ जवळ नाहीशी झाली होती. सारांश, मी कोणातरी फसव्यांच्या नादी लागला आहे अशी नंदशंकरशेटजींना जी शंका वाटत होती तिजमध्ये यत्किंचितही तथ्य नव्हतें; व त्यांच्या त्या साधेभोळेपणाबद्दल मला त्यांची कीव आली ! , मी बराच वेळ बोलत नाहीं असे पाहून शेटजी लागलीच आपल्या जागेवरून उठले व शेजारच्या माडींतून त्यांनी कसलेसे एक कामदांचें पुडकें आणिलें; आणि त्यांतून शंभर शंभर रुपायांच्या पाच नोटा काढून त्यांचे नंबर त्यांनी एका कागदावर लागलीच टिपून घेतले, व त्या नोटा करून तेह्मणाले " भगवानदास, माझं ह्मणणं अजून तुमच्या ध्यानांत आलं नाहींसं दिसतं तुझाला पांचशे रुपये कसे यावे असा मला विचार पडला असावा असं तुह्मी समजत आहा की काय ? तुमच्या- •सारख्या गृहस्थाला पांचशे रुपये द्यायला मी आढेवेढे घेईन असं तुझाला 4