पान:मयाची माया.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. CC केलें, "दोन किंवा चार दिवसापुरतेच पाहिजे होते; पण ते आजच्या आज मिळून उद्याला त्याच्या हाती पडतील तर उपयोग ! " 66. हो मी समजलों; पण काय? आणखी किती ? तुम्हाला आज कांहीं पैसे कां पाहिजे आहेत ? ” 66 होय, शेटजी, फक्त पांचशे रुपये; आणखी रकमेबद्दल मी स्वत: जामीन गहतो. आपण त्याबद्दल बिलकुल काळजी करूं नका ! रुपये आपण मलाच दिलं आहेत असं समजा; आणि कसेंही करून माझ्या त्याँ नडलेल्या मित्राची गरज भागवा येवढीच विनंती आहे. " 6" यावर शेवजी थोडासा विचार केल्यासारखे दाखवून ह्मणाले, " हात्तेच्या येवढंच ना काय ते ! मी झटलं असं आहे तरी कसलं काम; आणखी त्याबद्दल विनंती ती काय करायची आहे ! " 66 अंह, शेटजी तसं नव्हे. बाबांची आपल्याजवळ मोठी पत आहे. त्यांनी सांगितलं तर आपण पाचशेच काय पण पांच हजार सुद्धां सहज द्याल है मला चागलं माहीत आहे. पण हा व्यवहार माझ्या मनांतून बाबांना कळवायचा नाहीं. कारण दोनचार "दिवसांची तर कथा ! माझ्या मित्राकडून रक्कम तेव्हांच मोकळी होईल; आणखी ती परत आली कीं, लांगलीच तुमची तुझाला मी देऊन टाकणार. " भगवानदास, तली ह्मणतां त्याबद्दल मला मुळींच धास्ती वाटत नाहीं. मला शंका येते ती वेगळ्याच गोष्टीची ! हे पैसे कोणाला पाहिजे आहेत, तुमचा तो मित्र कोण, कुठला, उद्योग काय करीत असतो वगैरे गोष्टींची तुझी नीट चवकशी केली असेलच ह्मणा; पण कदाचित् तसं झालं नसलं तर मात्र या गोष्टीनें तुझाला पश्चात्ताप होईल. माझं ह्मणणं येव- ढंच कीं, अगोदर काय तो नीट तपास करा. माझं काय, येवढ्या रकमेचं झणजे मला कांही वाटेल अशातला भाग नाहीं. पण सध्याच्या काळांत भामटे, मित्र म्हणून—लोकांना भोळ्याभाबड्या लोकांना-ना लावून आपला विशेष स्वार्थ साधतांच त्यांना तोंडघशी पाडतात; इतकेंच काय, पण हव्या त्या माणसाचा गोड गोड बोलन हवातसा उपयोग करून घेतात व शेवटीं त्यांचा नाशं करायलाही मार्गेपुढे पहात नाहींत. हल्लींचा काळ मोठा