पान:मयाची माया.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० वा. ८४ त्याला धीर देऊन चकलों आहे. पण हे केवळ आपल्या आधारावर ! माझी स्वतःची सध्या तरी निदान घरी लिहिल्यावांचून कांहीं तशी स्थिती नाहीं. पण पाहिजे तं असलं तरी त्याला दिलेलं वचन मला कांहीं मोडतां येत नाहीं. कारण तो सर्वस्वी माझ्या विश्वासावर अवलंबून बसला आहे. आणखी हो, उद्यां त्याचं काम झालंच पाहिजे. तेव्हां आपण मनांत आणिलं तर त्याच्यावर किंवा पर्यायानं माझ्यावर आपले उपकार होणार आहेत. " 66 पण असे उपकार होण्यासारखं तुमचं काम तरी कोणतं आहे ? " शेटजीनी माझ्याकडे निरखून पहात पहात प्रश्न केला. “ तसं ह्मणण्यासारखं कांहीं नाहीं. " मी त्यांना चढविण्यासाठीं • पुन्हा ह्मणालों " आज माझ्या हातांत नाहीत नाहीं तर आपल्याला तसही देण्याचं कारण नव्हतं. त्याची' नड मीं केव्हांच भागविली असती !" 66 पण पुढे काय ते बोलाल तर खरं ! १; शेटजी उत्सुकतेनें ह्मणाले. त्यांच्या ठिकाणीं किंचित् दया उत्पन्न करण्याच्या उद्देशानें मी सांगू लागलों, “ कार्य करील चिचारा ! येवढा सधन असून ऐन प्रसंगाच्या वेळी कसा अगदी नाडला आहे; आणखी तो देखील स्वतःच्या कोण त्याच चुकीनं नव्हे - केवळ एका लुच्याच्या विश्वासघातानं ! " 66 इतके बोलून आपल्या स्नेह्याची ही करुणास्पद स्थिती पाहून फार दुःख होत आहे. असें शेटजीना भासविण्यासाठी मी मुद्दामच आपला हात डोळ्यांना लावून आपल्याला दुःखाश्रु येत आहेत असे दाखविलें ! हे पाहून शेटजी अधिकच उत्सुकतेनें व सद्गदित अंतःकरणानें ह्मणाले, भगवानदास तुमचा मित्र संकटांत सांपडल्यामुळे तझाला इतकं दुःख होत आहे हे पाहून मला फार वाईट वाटतं. माझ्या हातून कांहीं होण्या- सारखं असलं तर ते मी आनंदान करीन. अहो, तुझाला दुःख करितांना पाहिलं झणजे मला बरं कसं वाटेल! एकमेकांच्या उपयोग आपण पडलों नाहीं तर आपल्या लोभाचं आणखी ऋणानुबंधाचं काय करायचं आहे. तुझाला काय पाहिजे आहे ते मला अगोदर सांगा पाहूं? " “ शेटजी तसं कांहीं नाहीं !" दुःखाचा सुस्कारा टाकून मीं उत्तर