पान:मयाची माया.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ८३ आणखी अशा माणसाला भुरळ घालणं त्यांना तर अगदर्दीच सोपं... तुझांला कोणी फसविलं असेल असं माझं ह्मणणं नाहीं. पण - " ...हें शेटजींचं बोलणं रेकून मला त्यांचें किंचित हसूं आलें; व मी मनांत ह्मणालों " नवा मनुष्य तुमच्यासारखा अजागळ असला पाजो त्याला फसवायला मुंबईशहरांतलाच एखादा लुच्चा पाहिजे असं नाही. माझ्यासारखा गांवढळ देखील हे सहज करील !" आपण केवढें विल क्षण कार्य केलें आहे अर्से वाटून मी त्यावेळीं गर्वाने अगदीं फुगून गेलो " अहो शेटजी तुझी आहांत कोठल्या भ्रमांत ! तुमच्या या मुंबई शह- रांत ! येऊन एखाद्या अस्सल भामटयाला देखील जे फसवेगिरीचं काम साधणार नाहीं असलं काम तुमच्या मुंबईतल्या एका खुपसुरत तरुणीला भलतेंचं सोंग घेऊन नादी लावण्याचे-नव्हे वश करण्याचं - अवघड काम भी सहज एक दोन दिवसांत करून टाकलं आहे ! : "असे शब्द " उच्चारण्याच्या मी अगदर्दी बेतांत होतो; पण मला बोलण्याला फुरसत मिळण्यापूर्वीच शेटजी खालीं गेले आणि लागलीच एका गड्याने मला जेवायला झाल्याबद्दलची सूचना केली त्यामुळे मीही खाली गेलो. यामुळे साझ्या दर्पोक्तीला अवसरच सांपडला नाहीं व नंतर थोडा विचार केल्यावर आपण भलतेंच बोललो नाहीं है बरे झालें 2" असे मला वाटलें ! 66 आमचें जेवणखाण आटोपल्यानंतर पुन्हा शेटजी व मी माडीवर येऊन बोलत बसलो. शेटजींना आपली अडचग कळवावी ह्मणजे कांहीं तरी उपयोग होईल असे एकसारखें माझ्या मनात घोळत होते व मी लाग- लीच त्यांना ह्मणालों " शेटजी, आपल्याला एक विनंती आहे. आपण • मनांत आणिल्यास माझं काम सहज होणार आहे. " 66. हं, तुमचें काय काम आहे तें सांगा तर खरं; ह्मणजे पाहतो. • माझ्या हातन होण्यासारखं असलं तर करीन. " " काम कांहीं असं ह्मणाण्यासारखं अवघड आणखी आपल्यासार-.. ख्याला तर मुळींच कठीण नाहीं. " मी मुद्दामच किंचित् निष्काळजीपणा दाखवून ह्मणालो, "माझा एक स्नेही मोठ्या अडचणींत पडला आहे. त्याला ऐन नडीच्यावेळी एका इसमानं फसविलं त्यामुळं तो मोठ्या प्रसंगांत आहे. आणखी तुला खात्रीनं मदत करीन असं सांगून मी