पान:मयाची माया.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० बा. होती. तिचें ह्मणणें सुंदर तरुणींच्या नादी लागून वेडा होऊन जाणाऱ्या कोणत्याही तरुण परुषाने सहज मान्य केलें असतें. पण माझ्या त्या वेळच्या स्थितीत ती गोष्ट मला अगदी अशक्य वाटल्यामुळे आता काय करावें, येवढीशी गोष्ट - आपली प्रिय शिरीन संकटांत सांपडली असतां तिच्यासाठी येवढीशी क्षुल्लक गोष्ट- करण्याला देखील आपण असमर्थ आहों असे जर कळले तर तिला किती वाईट वाटेल ! हेच कां तिच्या ठिका- णचें आपलें प्रेम की ज्याच्यासाठी आपण आपला प्राण देखील खर्ची घालं असे तिला वचन दिले असूनही आपल्या हातून असली यःकश्चित् गोष्टही घडूं नये ! छे ! ते कांहीं नाहीं ! तिनें सांगितलेले काम आपण करणारंच ! मग काय होईल तें होवो ! असा शेवटीं मीं निश्चय ठरविला. ८२ 6 मी घरी जाण्यापूर्वीच नंदशंकर शेटजी लिमडीहून परत आले होते. मी घरों आलों त्यावेळी रात्रीचे आठ वाजून गेले होते; आणि नंदशंकर शेट माझी वाट पहात बसले होते. मला पाहतांच त्यांनी विचारलं "कां भगवानदास, आज सकाळपासून कोठें गेला होता तुझी इतका वेळ ? मला वाटतं तुझी आज वाटेंत कुठे चुकला बिकला होतां कीं काय ? नवीन माणसानं या मुंबई शहरांत मोठ्या बेतानं वागावं लागतं; कारण अगोदर शहर अफाट, आणखी त्यांतल्यात्यांत इथें नानाप्रकारचे लोक आहेत. नवा माणूस चुकण्याचा ह्मणा की फसण्याचा ह्मणा पुष्कळ संभव असतो. खेडेगांवांतल्यासारखे इथले सारेच लोक गरीब, निरुपद्रवी, संभावीत असतात असं समजूं नका हो ! " " छे, छे, भलतंच ! शेटजी तुमचं सांगणं चुकीचं आहे असं मी ह्मणत नाहीं. तरी मी पुष्कळ दिवस मुंबईत राहिलों नसलों ह्मणून मला या साध्या गोष्टी माहीस नाहींत असं नाहीं. आपण ह्मणतां त्या सर्व तन्हा मला ऐकून चांगल्या ठाऊक झाल्या आहेत त्यावरून मी सहसा कांहीं फसणार नाहीं अशी मला खात्री वाटतें. " 66 “ तसं असलं तर उत्तमच ! " शेटजी माझ्या तोंडाकडे पहात ह्मणाले, पण व्यवहारांत चांगल्या शहाण्यासुर्त्या माणसाला देखील नादी लोव णारे आणखी सहज ठविणारे कित्येक फसवे या शहरांत ठिकठिकाण आहेत. तुमच्यासारखा नवा मनुष्य त्यांना तेव्हांच ओळखतां येतो