पान:मयाची माया.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ८१ मला बिलकुल इष्ट वाटलं नाहीं कारण तसे करण्याने आपण आपली सर्वच हकीकत त्याला थोडक्यांत कळविल्याप्रमाणे आहे असे समजून हँगिंगगार्डन पहायला कां जावयाचं या गोष्टीचा त्याला मी मागमूसही लागू दिला नाहीं. पण गार्डनमध्ये जावयाला आली निघाल्यापासून किंवा मी. मनुभाईकडे गेलों तेव्हांपासन- आह्मीं परत येईपर्यंत जे जे काहीं त्याच्या दृष्टीस पडले त्यावरून माझ्या हातांत शिगनचे पहिले पत्र पाहिल्यापासून जी माझ्याबद्दलची शंका त्याच्या मनांत उत्पन्न झाली होती ती अधिकच दृढ होऊन तो मला तरतऱ्हेनें विचारीत होता. गार्डनमध्ये आमच्या शेजारी बसलेल्या दोघीं तरुणींचा संवाद माझ्याप्रमाणें ताही अगदर्दी लक्ष्यपूर्वक रीतीनें ऐकत होता; व त्यावेळी माझ्या वृत्तींत स्वाभा- विकपणानेंच जो एकप्रकारचा फरक पडला त्यामुळेच माझ्यावर कांहीं तरी संकट ओढवणार अर्से त्याच्या मनानें घेतलें; आणि त्याप्रमाण त्यानें हा नाद तूं सोडून दे. याचा परिणाम वाईट हाईल" अशा अर्थाची सूचनाही केली. पण ती सूचना ऐकून त्याप्रमाणे वागणं - हाती घेतलेलें अशाप्रकारचें काम मध्येच परिणामाच्या भीतीनें सोडून देणे- केवळ बायकीपणाचे वाटून त्याने केलेल्या उपदेशाकडे मी समजून उमजून दुर्लक्ष्य केलें ! त्यामुळे त्याचा परिणाम ठरल्याप्रमाणे झाला यांत कांही • आश्चर्य नाहीं ! 6. - मनुभाई आपल्या ठिकाणाकडे गेल्यावर मी लागलींच आपल्या बिहार्डी आलों व आपण तिच्यासाठी हवें तें करूं, प्रत्यक्ष आपला प्राण देण्यासही मार्गेपुढे पाहणार नाहीं असे तिला नुकतेच दिलेले वचन आपण खरे करून दाखविल्याशिवाय राहणार नाहीं; अशा आशेनें शिरीननं पत्रांत लिहिलेले आपल्याला करावयास सांगितलेले कार्य आपल्या हातून कसे पार पडणार, या विलक्षण विवंचनेने माझे चित्त अगदी भ्रमन गेल्यासारखे झाले होतें ! तिनें कांहीं मला आपला जीव यावयाला सांगितले नव्हतें; किंवा मी एखाद्या कड्यावरून उडी टाकावी, अथवा कोणत्याही मनुष्याला अगदी अशक्य वाटणारी अशी एखादी गोष्ट मी करून दाखवावी असे कांही तिने मला लिहिले नव्हतें ! एका अगदी साधारण अशा कामामध्ये तिनें माझ्या मदतीची अपेक्षा केली १५