पान:मयाची माया.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० वा. माहिती मोठ्या धूर्तपणा न मिळविण्यासाठी, व शिरीनला फसविण्याच्या काम आपण पिरोज ह्मणून आणलेले सोंग आपली व तिची भरदिवसां गांठ पडण्याचा प्रसंग आल्यामुळे उबडकीला येऊन आपला फजीति होतें कीं काय हे पाहण्यासाठी मो मनुभाईकडे गेलो होतो. पिरोजबद्दलच्या संकटाला आपणच तोंड देऊन युक्तीप्रयुक्तीनं तें नाहींसें करावयाचें व आपला निरुपायच झाला तर मात्र मनुभाईला आपल्या मूर्खपणाचा सर्व वृत्तांत निवेदन करून त्याची मदत घ्यावयाची; कारण, आपलें गुह्य दुष्ट वासनेला बळी पडून आपण हाती घेतलेले घाणेरडे कृत्य दुसन्याला कळू देगें ही नामर्दपणाची अत्यंत अपमानास्पद गोष्ट होय असें मी ठरविलें होतें व दोनप्रहरी रस्त्यावर उभा असतांना जे कांहीं माझ्या नजरेला आले तें माझ्या नीच हेतूला सर्वप्रकाराने अनुकूल अर्से वाट्न भावी यशाच्या आशेनें मला अतीशय आनंद झाला होता. मनुभाईच्या सांगण्यावरून पिरोज या नांवाचा कोणी पारशी विद्यार्थी कॉलेजमध्ये असेल व कदाचित् असलाच तरी तोही लंगडा - मनुभाईच्या संदिग्ध बोलण्यावरून मी असं अनुमान केलें- होऊन गेलेला झगजे अर्थात् अजारी ! आपल्याला आतां त्याच्या- पासून कोणत्याही प्रकारचा त्रास पोचेल अशी बिलकुल शंका येण्या- लाही जागा नाहीं असें मी मोठ्या गर्ने आपल्या मनांत ह्मणालों, व समोरच्या बाजूला एका गाडीपाशी दिसलेला लंगडा पारशी एका स्त्रीच्या मदतीने गाडींत बसत आहे असे दृष्टीस पडतांच आपण आता अगदी निर्वास झालों या गोष्टीबद्दल माझी खात्री होऊन चुकली. त्या लंगड्या माणसाला गाडींत बसविणारी तरुणी कोण असावी याकडे मी फारसें लक्ष दिले नाही. कारण शिरीनच्या दुसऱ्या पत्रामुळे माझे मन नवी- नच एका व्यवसायांत गढ़न गेले होते; व पत्र वाचन पाहिल्यापासून एक व विचार मनात घोळत असल्यामुळे 'मला काल रात्रीपासन करमे- नासे झाले आहे, आता आपण कोठेंनरी हिंडायला जाऊं? असे मनुभा- ईला जरी मीं सांगितले होते तरी ते अक्षरशः खरें नेव्हते. हँगिंग गार्डन कोठे आहे हे पाहून यावे अशी त्यावेळी मला अनावर इच्छा झाली होती है कांहीं खोटं नव्हे; पण तसे करण्यांत माझा हेतू मात्र अगदीं निराळा होता; व तो स्पष्टरीतीनें मनुभाईपाशी व्यक्त करून दाखविणे