पान:मयाची माया.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची गाया. मी करीत असलेली मोष्ट चांगली नाहीं अर्से मला एकट्या मनुभाईनेंच दोन तीन वेळां बजावून सांगितलं होतें असें नाहीं. माझं मलाही मधून मधून असेच वाटत होतें, आणि मी शहाण्या माणसाप्रमाणे वागलों असतो तर नंदशंकरशेटजीकडे आलेल्या त्यांच्या एका स्नेहाने त्यांना जें काही सांगितले त्यावरूनही माझ्या मूर्खपणाबद्दलची चांगली कल्पना मला सहज येण्यासारखी होती; पण त्यावेळी मला लागलेल्या नादानें -एका सुंदर तरुणीला वश करण्याच्या पापवासनेनें- मी अगदी वेडावून गेलों होतों; माझी मति अमदर्दी अष्ट होऊन गेली होती; आपण काय करीत आ याचा पाँच भावी संकटाची इशारत मिळाली असूनही, मला राहिला नाहीं. अविचाराने एखादी भलतीच गोष्ट करण्याला प्रवृत्त होणारा मनष्य येरवीं कितीही महणा असला तरी तेवढ्या वेळा पुरता त्याचा शहाणपणा, त्याची अक्कल, त्याचा दूरदर्शीपणा वगैरे सर्व गुण कचकामाचे होऊन जातात; पप्प अशा गोष्टी मनुष्याच्या अविचाराने घडत असल्या तरी त्यात्यावेळी तशी तशी बुद्धि झाल्याखेरीज मात्र असें होत नाहीं. विपत्ति- काठ आला झणजे शहाणे लोकही फसत असतात; मोठमोठ्या कर्त्या पुरुषांची अक्कल गुंग होऊन जाते; ज्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेपुढं प्रत्यक्ष लक्ष्मीही केवळ हात जोडून उभी असावयाची त्यांना वेळेला पोटाला मिळण्याचीही पंचाईत पडते, असं क्षणभर वाटतें; पण सूक्ष्म दृष्टीनें विचार केला तर विपरीत अशा सर्व प्रकारच्या गोष्टी अविचारामुळंच घड़न येतात असे ह्मणावें लागते; कारण सहसा कधीही न फसणारे शहाणे लोक, कसल्याही संकटांतून निभावून जाणारे कर्ते पुरुष, आणि लक्ष्मीला आपल्या केवळ लीलेनें नांचविणारी बुद्धिवान् विद्वान् माणसे जगांत ज्याअर्थी आपल्याला दृष्टीस पडतात त्याअर्थी मनष्याच्या विचा राकडे, दीर्घदर्शित्वाकडे बरेंच कर्तृत्व यावें लागतें; व ज्याअर्थी विपत्ति- काल केव्हा येणार है कळणें दरापास्त आहे त्याअर्थी कोणतेही कार्य योग्य विचाराने करणे हे शहाण्या माणसाचें, किंबहुना प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे असे समजले पाहिजे. पण हे विचार त्यावेळी मला सुचले नाहींत ! पिरोजबद्दलची भीती कित- पत टिकणारी आहे; याचा अजमास लागावा ह्मणून त्याच्या संबंधाची