पान:मयाची माया.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग १० वा. केली असती ! इतकंच नव्हे पण अजूनही मला तूं सर्व हकीकत अगदी मोकळ्या मनानें सांगितलीस तर मी तुला संकटांतून सोडविण्यासाठी हवे ते यत्न करीन; पण ज्याअर्थी माझ्याशी अशी प्रतारणा करणं तुला बरं वाटतं स्याअर्थी तुझं काहीं जरी झालं, तूं मूर्खपणानें ज्या भलत्याच गोष्टीच्या नाद लांगला आहेस तिचा शेवट कितीही वाईट. झाला आणखी तो तसा झाल्यावां.. चून मात्र राहणार नाहीं असें मी तुला बजावून ठेवतों-तरी त्याला माझा काहीं उपाय नाहीं. असो; मर्जी तुझी ! आतां माझं. मित्राचं कर्तव्य ह्मणून. मी तुला सांगून ठेवतों की, आज उयां, पुढे मागें केव्हाही जरी माझं सहाय्य पाहिजे असं तुला वातलं तर तूं त्याप्रमाणं मला कळीव. थोड- क्यांतच तुझ्यावर येणाऱ्या संकटाची इत्थंभूत हकीकत. मला सांगायला हूं लाजूं नको किंवा कोणत्याही प्रकारचा संशय मनांत आणूं नको. झणजे माझ्याकडून होईल. तेवढी मदत केल्याशिवाय मी राहणार नाहीं. बरं तर आता मी जातों. पण पुन्हा तुला आणखी एकदां बजावून ठेवतों की असल्या प्रकारच्या नादीपणाचा, अविचाराचा परिणाम कधही चांगला होत नाहीं. हे माझं. ह्मणणं लक्षात आणून अजून देखील. मूं आपले डोळे उघडलेस व तो नाइ सोडून दिलास तरी चालण्यासारखं. आहे. पण मी सांगतो ते न ऐकतां अदूरदर्शित्वानं तुझ्या मूर्खपणाची, उल्लूपणाची मजल यापुढे गेली ह्याणजे मात्र तुला संकटाची इशारत. मिळाली असूनही, शेवटी आपल्या हातानं आपण आपला नाश करून घेतला असं तुला वाटल्यावाचून राहणार नाही. या उपर तुली मर्जी ! " यावेळी त्याला सर्व हकीकत स्पष्टरीतीने कळवावी असे. एकदा माझ्या. मनांत आले होते; पण हा वेडा आहे, याला असल्य गोष्टी. कशा कळणार ! ह्मणेनाको सध्या काय हवं तें. थोड्याच दिवसांत आपल्या मनाप्रमाणे सर्व कांहीं जमून आलं ह्मणजे हाच मनु.ल.ई. आपलं वर्णन करूं लागेल असे मी ठरविले आणि तूं हे आपलं भलतंच कांहीं. तरी मला सांगतो आहेस झालं, असें. मी त्याला म्हणणार होतों; पण त्याच्या' बोलण्याला मी कांहींच जबाव दिला नाहीं असे पाहतांच तो लागलींच तेथून आपल्या ठिकाणाकडे झपाट्याने निघून गेला; व मीही त्याच्या वेडे- पणाबद्दल मनामध्ये त्याला ठेवीत नंदशंकरशेटजींच्या घरी आलों ! 3 6 "1