पान:मयाची माया.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया, व त्या स्त्रिया जाईपर्यंत मी. तेथून हाललोंही नसतो, नव्हे त्यांचा तपास, त्यांची ओळख करून घेतली असती; पण. 'आतां परत गेलेच पाहिजे. 25 असें मनुभाईनें दोन तीन वेळां मला सांगितल्यामुळे मी अगदीं निरुपाया त्याच्याबरोबर परत फिरलो ! ७७ प्रसंग १० वा. kavi- हाँगाईन पाहून आह्मी निघाल्यावर वाटेनें येतांना "फॅन्सी फेट पहायला आज जायचे आहे की काय ? " असे मनुभाईनें, मला विचारलें; पण शिरीनचें दुसरे पत्र माझ्या हातों कोणीस आणून दिल्यापासून मां. कांहीं निराळ्याच फिकीरीत पडल्यामुळे पुन्हा फॅन्सी फेट पहावयाला जाण्याचा वगैरे सर्व विचार मी आपल्या मनांतून काढून टाकले होते. ज्या नव्या विवंचनेनें माझें चित्त उद्दिन केलें होतें तिच्यापुढे मला दुसरी. कोणतीही गोष्ट सुचेनाशी झाली होती; व पत्र वाचून पाहिल्यापासून.. आतां या संकटाचें निवारण कसे करावं हा एकच विचार माझ्या मनांत एकसारखा घोळत होता. त्यामळे फॅन्सी फेट पहावयाला जावयाचें नाहीं. असे ठरवून त्याप्रमाणे मनुभाईला कळविलें; व तो आपल्या ठिकाण, निघून गेला; पण जातांना तो माझ्यावर रागावल्यासारखें करून ह्मणाला भगवानदास, तं पाहिजे तसा बहाणा केलास तरी माझ्यापासून तं इतका वेळ लपवून ठेविलेली गोष्ट मला कळली नाहीं असं मात्र समजूं नको. तुझा च माझा लहानपणापासून स्नेह असून तूं कोणतीही गुप्त गोष्ट- मग ती कशी, का असेना–सांगणार नाहींस असं मला वाटलं नव्हतं ! तूं सध्यां कुठल्या. तरी भानगडीत सांपडला आहेस ही गोष्ट आज दोन प्रहरीं, तूं त्या पिरोजचा शोध करण्यासाठीं ह्मणून जेव्हा माझ्याकडे आलास तेव्हापासू नच मला कळलेली आहे. पण मनांतला खरा हेतू मला कळूं न देतां तूं भलतेंच कांहीं तरी सोंग करून मला फसविण्याचा यत्न केलास है. कांहीं एकंदरीनं चागलं केलं नाहींस तं कोणत्या प्रसंगांत सांपडला.. आहेस हे जर मला सांगितलं असतंस तर तुला मी पाहिजे ती मदत, 60