पान:मयाची माया.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ९ वा. . बाईच्या मनांत तिच्याबद्दल कांही शंका आली आहे की काय ? मला नाहीं बाई यातलं कांहीं कळलं. " 6" .अग दोन तीन दिवसांत तूं तिला णार तरी कसं. " भेटलीच नाहींस मग कळ- असें ह्मणून तिनें आपलें तोंड तिच्या कानापार्शी नेल्यासारखें केलें. आणि किंचित् हलक्या आवाजाने ती कायसें बोलली. हे मला कांहीं. चांगलेसें ऐकूं आलें नाहीं. कारण, यावेळीं अगोदरच ती हलक्या आवाजानें बोलत होती आणि त्यांतून मनुभाई पुन्हा मला त्याबद्दल विचारूं लागला होता. पण त्याचें बोलणे मी फारसे ध्यानांत न आणतां आपले सर्व लक्ष तिच्या बोलण्याकडे लाविलें होतें; व ती काय सांगते हैं. आपल्याला कळले तर फार बरे होईल असे वाटून तिचें बोलणे ऐक- ण्याविषयीं मी अतीशय उत्सुक होऊन गेलो होतों, तोंच दुसरी स्त्री उद्गा- रली " अगबाई ! असले जिन्नस, आईला न विचारतां तिनं त्याला. देऊन टाकलेन अं ! कोण तरी बाई हा तिचा वेडेपणा ! मग कुंवर बाई इतक्या रागावल्या त्यांत कांहीं नवल नाहीं. बरं पण ते जिन्नस मीं, अमक्याला दिले आहेत असं तिनं कुंवरबाईजवळ अजून तरी कबूल केलंन् कीं नाहीं ? " 66 6 माझ्या: अग, आपल्या वरूनच पहा ह्मणजे झालं ! अग तर असली नाजुक, गोष्ट दुसन्याला कोणी तरी सांगेल कां ? तिनं आपलं नुसतं हातून जिन्नस हरवले ' असं सांगितलंन्. एकंदरीनं बिचारी मोठ्या संक- टांत सांपडली आहे येवढं खरं ! " अग, आई इतकी रागावली आहे तर मग ते जिन्नस तिला परत नाहीं कां मिळायचे ? ते आणून तिनं आईला दाखविलेन् ह्मण जे, झालं ! ” " हो तिनं तशी खटपट तर चालविली आहेन् खरी; आणग्वी ते जिन्नस, आणखी रुपये देखील आपल्याला मिळतील असं तिला वाटत आहे; मग. पहावं काय होतं तें. " 1 त्या दोघींचें सर्व संभाषण आपल्याला ऐकायला सांपडेल, त्या कोण, आहेत हे आपल्याला कळेल तर बरें होईल असे मला होऊन गेलें होतें.