पान:मयाची माया.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. एका बाकावर बसून इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागलों.. तेव्हां त्या दोघी स्त्रिया आमच्या शेजारच्या बाकावर येऊन बसल्या. त्यांच्या दोघींच्या तोंडाकडे मी वरचेवर न्याहाळून पहात होतों; पण त्या माझ्या ओळखीच्या आहेत असे मला वाटले नाहीं. खरोखरी त्या दोघी स्त्रियांना मीं कांहा कधीं पाहिले नव्हते, तरी त्यांचा संवाद मधून मधून माझ्या कानावर पडत होता. त्यावरून त्यांच्या बोलण्याचा विषय मात्र आपल्या माहितीचा आहे. अशी माझी खात्री झारी. कारण त्यापैकी एक स्त्री सद्गदित अंतःकरणानें दुसरीला ह्मणाली, " खरंच बाई तिच्याबर प्रसंग तर मोटा कठीण आला आहे. तिच्या आईनें परवाच्याच दिवशीक तिच्यापाशी एका अनाथ बाईला धर्म करण्यासाठीं ह्मणून पांचों रुपये/ दिले होते. कुंवरबाईनी ते आपल्या एका मैत्रिणीकड. पांचवायला सांगून ते तिला दिले होते; पण तिनं तसं न करितां ते रुपये आपल्या पिरो. जच्या गरिवींत त्याला फार उपयोगी पडतील असं वाटून त्याच्याकडे पाठविले; पण ते पिरोजच्या हाती न पडतां जधल्या मध्येच ते कोणी तरी लांबविले, असं कळतांच तिला फार वाईट वाटलं ! बर कुंवरबाईनां ही गोष्ट समजली नसती तरी एक बरं होतं; पण त्यांच्या घरच्या एका चोंबड्या मोलकरणीनं त्यांना हे सारं सांगून टाकले ! तेव्हांपासून काय विचारतेस;: तिच्या अईबापांनी तिचे जे कांहीं हाल मांडले आहेत ते कांहीं पहावत नाहींत. " 66. “ तिचं चुकलं त इथेच ! " दुसरी स्त्री ह्मग.ली. 'अग पण खरी-- खरी गोष्ट होती तर, पैसे चोरीला गेले होते. तर, तसं तिनं आईला. लाग-- लीच कळविलं असतं तर, कुंवरबाई कांही कधी सगावल्या नसत्या. असं. मला वाटतं. अग त्यांच्यासारख्या श्रीमंतांना त्या. पांचशे रुपड्यांची: कथा ती काय ? २ 66 तूं ह्मणते खरं आहे पण कुंवरबाई अगोदरच तिघ्यावर अ संतापून गेल्या आहेत; आणखी तिच्या हातून हे पैसे, हरवल्याचं समजल्या-- मुळे तर त्यांना पहिल्यानं आलेली शंका अधिक बळकट झाल्यासारखी झाली. “ह्मण ने ?” विस्मयसूचक आवाजाने दुसरीनें प्रश्न केला " कुंवर