पान:मयाची माया.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असग ९ वा. माणूस तरी कोण आहे; आणखी त्याच्याशीं तुझं असं काम तरी काय आहे. तसंच कांही महत्वाचं काम असलं तर गोष्ट निराळी. " ७२ " माझं ... काम .. होय ? किंचित् अडखळत मी ह्मणालों. हो • तसंच काहीं असल्याशिवाय कां मी इतकावेळ रस्त्यावर उभा राहिलों असतो ! " पण " तुझं काय काम आहे असे मी तुला विचारणार होतों, " तो माझ्याकडे न्याहाळून पाहतांना पुन्हा हंसत ह्मणाला. तुझं काम जरा गुप्त, नाजुक असावसं दिसतं कां माझा अजमास बरोबर आहे कीं नाहीं ? " त्याचा हा खुचीदार प्रश्न ऐकून मी गोंधळून गेलों. त्याला आतां काय उत्तर द्यावें है मला सुचेना ह्मणून संभाषणाचा विषय बदलण्याच्या हेतूनें त्याला विचारलें, " कां मग लागला कां त्या पिरोजचा कांहीं तपास 2. कुठून बुवा है नसतं लचांड माझ्या मागं आज लागलं कोणाला ठाऊक. " " लचांड तर खरंच " तो गंभीरपणानें ह्मणाला. "पण तुला मनापा- सून तर तसं वाटत नाहीं ना ! तसं वाटत असतं तर तूं त्याच्या नादींच लागला नसतास ! " 66 पण यामध्ये माझ्याकडे रे काय अपराध आहे ?" 66 काय असेल तो तुझा तुला ठाऊक ! पण एकंदरीनं राजेश्री आज आपण कुठल्या तरी भानगडींत सांपडला आहां यामध्ये मात्र मुळींच शंका नाहीं ! तुझ्या चर्चेवरच तसं दिसतं आहे त्याला काय उपाय ! 66 काय मी आणखी मानगडींत !" ज कांहीं आपण त्या गांवचेंच नाही असे त्याला भासविण्याच्या हेतूनें मी आश्चर्यचकित झाल्यासारखे करून ह्मणालों छे, तुला आपली भलतीच कांहीं तरी शंका आली आहे झालं ! माझा गावड्या माणसाचा या मुंबईशहरांतल्या कोणत्या भानगडीशी संबंध असणार ! " माझे अशा प्रकारचे उद्गार ऐकून तो पुन्हा माझ्याकडे एकसारखा पहात स्तब्ध उभा राहिला. आपलें एकंदर वर्म त्याला कळले असावे असे त्याच्या मुद्रेवरून आतां माझ्या स्पष्टपणें ध्यानांत आले; पण त्याला ही गोष्ट कशी कळली असावी याचा मी विचार करूं लागलों; व आतां