पान:मयाची माया.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. डोळ्याला एकदां संवय झाली झणजे आजच्या इतकं आश्चर्य वाटणार नाहीं. " 66 त्तूं ह्मणतोम तें तसं असेल, त्याबद्दल माझं ह्मणणं नाहीं. पण कोण- त्याही प्रकारचा पोषाख घालतांना, आपण एक अमक्या मनुष्यासारखं दिसावं असं त्या माणसाला वाटत असतं; नाहीं ? " हे त्याचें मार्मिकपणाचे चाक्य मी ऐकलें, तरी पण त्यांतली खुची कांहीं माझ्या लक्षांत आली नाहीं; व मी चटकन् ह्मणालों " हो तसं कांहीं तरी वाटत असल्याशिवाय आपला नेहमींचा पूर्वीचा पोषाख टाकून दुसऱ्या एखाद्या विशेष प्रकारच्या पोषाखाची हौस मनुष्याला वाटायचं तरी काय कारण !" इतकें मी बोलून गेलों; पण लागलीच माझी चूक माझ्या लक्षांत येतांच मी आपला ऑठ चावला; व हैं सोंग आणण्यामध्ये आपला काय हेतू आहे हैं याला समजलं की काय असं वाटून मी पुढे ह्मणालों " तसं जरी असलं तरी सध्या माझ्या अंगावर दिसत असलेला पोषाख मी अमक्या एका हेतूनं केला आहे असं नाहीं. मी पडलों गांवढ्या, असला पोषाख, ही छानछुकी, ही ऐट, आमच्या गांवढ्यरत आह्माला कुडली मिळायला; तेव्हां झटलं सहज आपण मुंबई आलोच आहों; पाहूं यामध्ये तरी काय मजा असते ती ! " 66 66 हं ते माझ्या केव्हांच ध्यानांत आलं ! पुन्हा हंसून व डोळे मिच- कावून तो ह्मणाला. पण आतां या रस्त्यावर आणखी किती वेळ असंच उभं राहण्याचा तुझा विचार आहे ? " 66 अरे, माझ्या ओळखीचा एक इसम इकडे यायचा आहे; ह्मणून त्याची मघापासून मी एकसारखा वाट पाहतो आहे; पण अजून देखील कांहीं तो कुउं या बाजूला दिसत नाहीं. " “ इकडे तो अभकश वेळेला येणार असं ठरलं असलं, आणखी तो खास येणारच असं तुला ठाऊक असलं तर त्याची वाट पाहण्याचा उप- योग ! मी तर कांहीं बुवा, कोणाचीही वाट पहात रस्त्यावर इतक्या उन्हांत कधीं उभा राहिलो नसतो. बरं पण त्या तुझ्या माणस कडून कांहीं निरोपविशेष तरी आला कां ? नाहींतर त्याची वाट पहात तूं असा वेड्या सारखा किती वेळ उभा राहणार ! बरं असा तुझा तो