पान:मयाची माया.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. तेथून कोठें तरी जावें अर्से मनांत आणून मी त्याचा हात आपल्या हातांत धरिला आणि ह्मणालों " मनुभाई, काल रात्रीपासून मला अगदीं चैन पडेनासं होऊन गेलं आहे, ह्मणून आज दोन प्रहरीं मी जेवलों देखील नाहीं. कुठे तरी क्षणभर फिरायला जाऊन पहावं बरं वाटलं तर. असं मनांत आणून मी खरोखरी तुझ्याकडे यायला निघालों; पण मध्येच ही पत्राची भानगड निघाली; आणखी तितक्यांत माझा एक ओळखीचा माणूस अमक्या अमक्या ठिकाणीं अमुक वेळेला आपल्याला भेटणार आहे अशीही आठवण झाली. ते असो ह्मणा. पण त्या पिरोजचा कांहीं पत्ता नाहींना लागत.' नसला 'कोणी' त्या नांवचा मनुष्य तुमच्या कॉलेजमध्ये तर मी तें पत्र टाकतों फाड़न ह्मणजे झालं ! आपण तरी काय करावं त्याला ! कोण बसतों आतां त्याला शोधीत; आणखी त्याचा तपास तरी लागायचा कसा ! जाऊं दे की, आपल्याला काय करायचं आहे त्या भानगडीशीं. " अर्से ह्मणून ते शिरीनचें मीं पत्र फाडून टाकिलें. i ७३ माझें बोलणें ऐकून तो सदयतेनें ह्मणाला " खरोखरीच तुला सुचेनास झाल्याचं ऐकून मला वाईट वाटतं. पण मुंबईशहरांतली मजा पाहण्या- साठीं तूं आलास आणखी कोणत्याही गोष्टींची तुला काळजी नसतां तुझं मन असं उदासीन कां बरं झालं असावं ? मला सांगायचं नसलं तर तूं पाहिजे तर सांगूं नको; पण मला तर वाटतं की, तुझे मन कंसल्या तरी फिकीरींत पडलं आहे. " 66 " फिकीर कशाची हाणा; पण मला काही सुचत नाहीं येवढं खरं. खरं काय रे, तूं त्या पिरोजची काही चवकशी केलीस कीं, नाहीं ?" २ " मी पुष्कळ तपास करून पाहिला, " पुन्हा त्याने हसत हसत उत्तर केलें. पण आज जितके विद्यार्थी कॉलेजमध्ये आले आहेत त्यांच्यामध्यें पिरोज या नांवाचा इसमे कोणीच नाही. आतां तूं ह्मणतोस कीं, तो तुझा पिरोज लंगडा आहे; तेव्हां यावरून मात्र थोडी शंका येते. कारण अंज एक वाजण्याच्या सुमाराला मी एका पारशी विद्यार्थ्याला लंगडतांना पाहिलं; आणखी थोड्या वेळांपूर्वी तो व्हिक्टोरियांत बसून या बाजने कुठेसा गेला; पण त्याचं नांव काय हैं मात्र मला ठाऊक नाहीं. " १०