पान:मयाची माया.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ९ वा. नाहीं. मुंबईत येऊन मला चार पांच दिवस झाले होते; कालपर्यंत मी कोठेही गेलों तरी धांतर नेसन व नेहमीच्या पद्धतीचा पोषाख करूनच जात असे. पण काल तिसऱ्या प्रहरी मला काय वाटले असेल तें वाटों, कित्येक लोकांचे पेहराव पाहून मी पाटलोण, नेकटाय, कॉलर गैरे विकत घेतली; व संध्याकाळीं तशा प्रकारचा पोषाख करून फेट पाहण्यासाठी गेलो. तूं अगर्दी हुबहुच पारशासारखा दिसतोस अशा अर्थाचं मनुभाई जें कांहीं मला ह्मणाला ते अगदी खरं होतें. कारण गेल्या रात्रीं पिरोजला पाहतांच याचा चेहेरा हुबेहुब आपल्यासारखाच आहे असे मला वाटलें; आणि पिरोजशी माझे बरेंच साम्य असल्यामुळेच शिरीन आपल्याला पाहतांच फवून आपल्या नादी लागली. ही गोष्ट. माझ्या ध्यानांत येतांच मला स्वतःबद्दल, माझ्या त्या पोषाखाबद्दल मोठ कौतुक वाटलें; आणि ज्याअर्थी या पोषाखाच्या सहाय्यानें शिरीन- सारख्या अप्रतिम सौंदर्याच्या तरुणीला आपण भुरळ घातली त्याअर्थी आपण मुंबईत आहों तो पर्यंत तरी निदान असलाच पोषाख घालावयाचा असें मीं ठरविलें, ७० मनुनाईचा चेहरा त्यावेळी कांही निराळ्याच प्रकारचा दिसल्यावरून त्यानं सांगितलेले कारण खरें नाहीं अशी मला शंका आली व मी त्याला ह्मणालों " तूं ह्मणतोस तसं जरी असलं तरी येवढ्यावरून ह्मण जे तुला इतकं हमूं यावं असं मला कांहीं वाटत नाहीं आणखी तूं ह्मणतोस तं खरं असतं तर कांहीं वेळापूर्वी जेव्हां तूं मला पाहिलंस तेव्हांच तूं हंसला असतास. " तसं नव्हे रे, ' माझी थट्टा करण्याच्या हेतूने त्यानें उत्तर दिलें, या पोषाखानें तूं अगदी हुबहुच पारशासारखा- मघाशीं त्या बाजुला जो एक लंगडा पारशी दिसत होता त्याच्यासारखा-तूं तो है जरी खरं आहे तरी हा पोषाख तुला चमत्कारिक दिसतो असं मला वाटतं. आणखी मला जें यवडं हंसं आलं तें तरी दुसरं कशानं ? " 6. , 66 तसं असेल ह्मणा; कारण अमका पोषाख आमक्या माणसाला शो किंवा न शोभतो असं वाटणं हे केवळ डोळ्यांच्या संवयीवर अवलंबून आहे असं मी समजनों. माझ्या अंगावरचा हा पेहेराव तुला चमत्कारिक दिसत असेल; पण हाच पोषाख मी नेहमीं घातलेला पाहण्याची तुझ्या