पान:मयाची माया.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. दिलेल्या पत्रांत-हे मी अद्याप वाचले नव्हते-याच गोष्टीचा कांहीं तरी उल्लेख असेल असें माझ्या लवकर ध्यानांत आलें नाहीं ! पण थोड्याच वेळांत ते पत्र मी वांचन पाहिलें; आणि त्याची घडी करून ते चटकन खिशांत घालीत असतांना माझ्या मागच्या अंगाला कोणीतरी मोठ्य नें हंसल्याचा मला भास झाला ! ह्मणून मी मार्गे वळून पाहिले तो मनुभाई माझ्या शेजारी उभा असल्याचें मला दिसून आलें ! मला पाहिल्याबरोबर तो अधिकच हंसूं लागला; ह्मणून त्या गोष्टीचें मला अतीशय आश्चर्य वाटून मी त्याला विचारले " मनुभाई, एकाएकीं इतकं हंसण्याचं रे कारण काय ? " 66 'अजूनही त्याचें हंस न आंवरतां त्यानें उत्तर केलें "अरे, कारण कपलं त्यांत आलं आहे. काल संध्याकाळपासून तुझ्या अंगावर हे पारशी तऱ्हेन्च कपडे पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे ! मी तुला यापूर्वी कधीं पाटलोण, नेकटाय, कॉलर वगैरे घालतांना पाहिलं नव्हतं ह्मणून तुझं हें सोंग दृष्टीस पडतांच मला हंसूं आवरेना ! " कारण हा कोण पारशी गृहस्थ आपल्याकडे आला बोवा, असा वरचेवर मला भास होत आहे. मी कालच तुला विचारणार होतो; पण आपण फेटमध्ये हिंडत असतांना तूं एकाएकी कोठे दिसेनासा झालास ! मी पुष्कळ तुझी वाट पाहून मग परत आलों ! » 66 तुझं हैं आपलं कांहीं तरीच ह्मणणं आहे झालं ! मी मुंबईत आल्या- पासून माझा याच प्रकारचा पेहराव असतों " खरें झटलें ह्मणजे मी त्याला है कांहीं तरी उडवाउडवीचें उत्तर दिले होते; कारण मी जातीचा कपोळवाणी असल्यामुळे आमच्यामध्ये पारशी त-हेची टोपी घालण्याची वहिवाट आहे; व आमच्या जातींतील बहतेक लोक असल्याच टोप्या- ( पागोटीं हैं मुळची आमचीं पागोटीं असून पारशी लोक गुजराथेत ● आल्यापासून ते असली पागोटी घालू लागले आहेत ) घालीत असतात. त्याचप्रमाणे कांहीं शिकले सवरलेले लोक बुट, पाटलोण, नेकटाय, कॉलर वगैरे घालीत असतात; पण मी खेडवळ ; पागोट्याशिवाय त्यावेळी माझ्या अंगावर जो पोषाख होता तसल्या तऱ्हेचा पेहेराव मीं कधींही घातलेला नव्हता; निदान मनुभाईच्या पाहण्यांत तसें आले नव्हतें हैं कांहीं खोटें