पान:मयाची माया.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ प्रसंग ९ वा. तिच्याशी बोलतांना आपल्याला जर कदाचित् मनुभाईनं पाहिलं असतं तर तेही कांहीं चांगलं झालं नसतं. तेव्हां एकंदरीन झालं हें एक प्रकारें ठीकच झालं असं मी आपल्या मनाचं समाधान करून आतां शिरीन आपल्याला पुन्हा कशी आणखी कोठें भेटणार असा विचार करीत होतों; व नुकतीच पाहिलेली गाडी तेथून निघून जातांच अंगांत खाकी कपडे घात लेला एक शिपाई गाडी ज्या रस्त्याने गेली त्याच रस्त्यानें धांवत धांवत माझ्याजवळ आला आणि त्याच्यापाशी असलेले एक पत्र चटकन् माझ्या हाती देऊन तेथे एक मिनीटभरही न थांबतां मोठ्या गर्दीने तो निघून गेला. तो शिपाई माझ्या समोरून आल्यामुळे मी त्याला तेव्हांच ओळखलें; व पुन्हा केव्हा आणखी कोठें भेटतील असं तो परत जाऊं लागतांच त्याला विचारण्याचा माझा बेत होता; पण मी “ पिराजी " ह्मणून त्याला हांक मारणार तोंच तो गर्दीनें धांवत डाव्या बाजूच्या रस्त्याने गेल्यामुळे तेव्हांच दिसेनासाही झाला ! आतां मात्र एकाएकी माझें मन बरेंच अस्वस्थ, उदासीन, निराश होऊन गेल्याचें मला वाटं लागलें ! पिराजी आपल्याजवळ येऊन देखील कांहींच बोलला नाहीं-शिरीन बद्दल माझें मन इतकें उतावीळ झाले असतांना त्यानें आपल्याला तिजबद्दल कांहींच सांगितलें नाहीं. याबद्दल मला वाईट वाटलें. कारण शिरीन बरोबर बहुतकरून नेहमीं असणारा हा पिराजी ज्याअर्थी परत आला आहे त्याअर्थी शिरीनही पण आपल्या आईबरोबर बाहेर गेली असली तरी ती केव्हांच पिराजी बरोबरच परत आली असली पाहिजे. आणखी आज साडेतीन होऊन गेले ( अर्से मला वाटत होत.) तरी तिनें आपल्या पाठविलेल्या आपल्याला पांचच मिनिटापूर्वी कळलेल्या-निरो- पावरून पाहिले तर ती याच्या अगोदरच येथं यावयाला पाहिजे होती, असें तो लंगडा पारशी गाडींत बसून गेलेला दृष्टीस पडतांच पुन्हा मला चाटू लागले होतें ! आतां तिच्या निरोपाप्रमाणे तीन वाजून पंधरा वीस मिनिटेंच काय, पण अर्थातास सुद्धां होऊन गेला असेल; आणखी या वेळीं ती येथें यावयाला पाहिजे होती. पण तीही आली नाहीं, आणखी त्या पिराजीनेंही पण तिच्याबद्दल आपल्याला कांहींच सांगितलं नाहीं याबद्दल मला राग आला ! कारण पिराजीने नुकत्याच आणून