पान:मयाची माया.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. आपल्याला मारण्याची त्याची काय-छाती आहे ! सारांश, भीतीनें लगा की पहाटे घेतलेल्या मदिरेच्या मुंगीनें ह्मणा-यण मदिरेनें असे झाले नसेलसें मला वाटतें – एकाएकी माझ्या डोळ्यापुढं सरासरी एक मिनिट- मर अंघरी आल्यासारखे मला वाटून तेवढ्या वेळांत कित्येक कल्पना मनांत आल्या ! आपले तोंड मार्गे न फिरवितां मी होतों तसाच एक मिनीटभर उभा राहिलों !. प्रसंग ९ वा.. माझ्या खांद्यावर हात ठेविलेल्या इसमानें मी त्याच्याकडे वळून पाह-- ण्यापूर्वीच अगदी हलक्या आवाजाने माझ्या कानांत कांहीतरी सांगित ल्याचा भास मला झाला !' काय, मी आपल्याशींच पुटपुटलों, 'शिरीन आतां इकडे. यावयाची होती; पण तिच्या आईबरोबर नुकतीच ती बाहेर गेल्यामुळे तिला परत यायला निदान पंधरा वीस मिनीटं उशीर होईल." हो इतकेच शब्द त्या माणसानं आपल्या कानांत सांगितले. शिरीनची आठवण होतांच मी मार्गे वळून पाहू लागलों तो एक गुजराथी स्त्री व एक लंगडत चालणारा पारशी तरुण जवळच उभ्या असलेल्या एका व्हिक्टोरियांत बसतांना माझ्या दृष्टीस पडले व ती व्हिक्टोरिआ मी उभा होतो त्याच्या डाव्या बाजूकडे जाणाच्या रस्त्याने पाहता पाहतां. तेव्हांच निघून मेली ! या गोष्टीचा माझ्या मनावर फारच विलक्षण परिणाम झाला इतकावेळ शिरीनची वाट पाहून शेवटी काही उपयोग नाहीं तो नाहींच. पण झालं. हें. एका अर्थी द्वेष झालं; कारण यावेळी जरी शिरीन. भेटली नाहीं तरी निदान आपल्यावर आलेलं संकट तरी टळलें ! शिरीनला भेटण्याच्या नादांत काही तरी दगा फटका होण्याचा. संभव होता तो टळला हें तरी काय थोड़ें. झाले.! आणखी त्यांतल्या. ल्यांत दुसरी गोष्ट अशी कीं, आपल्या इच्छेप्रमाणे अगदी निर्धास्त रीतीनं जरी शिरीनची व आपली येथे रस्त्यावर पडली अ ती तरी