पान:मयाची माया.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. व समुद्राच्या भरतीच्या लाटांप्रमाणे विचाराच्या लाटा मनामध्ये एक- सारख्या कशा आदळत असतील हे विशेष पाल्हाळाने वर्णन करण्या- पेक्षां त्यांची कल्पना करण्याचें, सहृदय वाचक हो ! मी तुझांवरच सोपवतों. या विचारचक्रींत भ्रमून इकडून तिकडे व तिकडून इकडे असें माझें मन हेलकावे खात असतां त्या रसिक पारसिक तरुणीची गालांतल्या- गालांत हसणारी व आपली कुर्रेबाज दृष्टि मजवर फेकणारी, आकाशांत विराजमान झालेल्या चंद्रम्याप्रमाणे शांत व आनंदमय मूर्ति माझ्या डोळ्यापुढे उभी असता एकाएकी माझा किंचित् डोळा लागला. या स्थि- तींत मी किती वेळ होतों है मला कांहीं सांगवत नाहीं. परंतु तितक्यां- तच ज्या गोड कल्पनांनीं माझें मन वेडावून गेलें होतें - जी गोड मूर्ति माझ्या डोळ्यापुढे सारखी उभी होती त्या गोड कल्पनांचं गोड स्वम मला दिसूं लागले. जिच्या पायाची पायधूळ आंगावर उडाली असतां मी आपल्याला कृतार्थ समजत होतों, जिच्या नेत्रकिरणांचा वर्षाव मला सुधास्नानाप्रमाणे वाटत होता, जिचा अंगराग नंदनवनांतील परागा- प्रमाणे वाटत होता, जिचे गोंडस हात माझे हात स्वर्गास पोंचवीत होते तेच आतां माझ्या गळ्याभोवती आहेत व तिचा मुखचंद्र आपलें अमृत माझ्या मुखांत ओतीत आहे आणि नैत्रतारा मला तारावयाला तयार असतां मी त्यांना सोडून निवालों ह्मणून मला दोष देत आहेत अर्से स्वप्न माझ्या दृष्टीस पडले. हे स्वप्न पाहून मी जागा झालों तांच काय चमत्कार सांगावा ती त्रैलोक्यसुंदरी स्वप्नांत पाहिल्याप्रमाणंच माझेजवळ बसलेली आहे असे मला दिसलें. प्रथम मला तें खरें वाटेना. मी बावरून उठलों व अजून मी स्वप्मांतच नाहींना ? किंवा ही भूतचेष्टा नाहींना असे विकल्प मनात येऊन तिजकडे साशंक दृष्टीने पाहू लागला. मी जागा होऊन दचकलेला पाहतांच ती पारशी युवती मजकडे एक स्निग्ध नेत्रकटाक्ष फेकून व आपलें गोंडस हात माझ्या खांद्यावर ठेवून मला ह्मणाली, “ पिरोज, ह्या तुझ्या गरीब शिरीन्ला तूं विसरलास काय ? किंवा फेटमध्यें तूं अगदी मजजवळ येऊन उभा राहिला असतां मी तुजजवळ एक चकार शब्दही बोलले नाहीं म्हणून तुला माझा