पान:मयाची माया.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग २ रा. शतेनें या कुलीन तरुणीचा आपण अतिशय अपमान केला याबद्दल मनांत अगदीं खजिल होऊन मी घराकडे न जातां विचाराच्या नादांत आपोलो बंदराकडे वळलों. ४ प्रसंग २ रा. • शिणलेल्या मनाला विश्रांति देण्यास व त्याची करमणूक करण्यास आपोलोबंदर ही एक मोठी रमणीय जागा आहे. मी मार्गे सांगितल्याप्र माणे विचारांच्या नादांत जो निघालों तो आपोलोबंदरावर येऊन पोहोंचलों. फेट्मधल्या गर्दीनें, धुळीनें, विजेच्या लकलकाटानें आणि चालण्याच्या अमानं अगदीं थकून व घामाघूम होऊन गेल्यामुळे या ठिकाणीं क्षणभर एकांतसुख घेऊन व तेथील गार वाण्यानें श्रम परिहार करून मग आपल्या बिहाडीं जावें असा बेत करून मी बसलों. तेथील गार वायानें व शीतल चंद्रप्रकाशांत कांहीं काल पाय पसरून स्वस्थ पडल्यावर माझा बराच थकवा नाहींसा झाला व नुकत्याच घडलेल्या त्या पारशी तरुणीच्या प्रसंगाची पुन्हा एकवार आठवण होऊन तिचें चित्र डोळ्यापुढे दिसूं लागलें. मी आपल्या मनाची पुष्कळ समजूत केली, पुष्कळ शंका कुशंका घेतल्या, तथापि तिनें मजकडे फेकलेले नेत्रकटाक्ष केवळ स्वाभाविक नसून त्यांत कांहींतरी हेतू असावा असाच माझ्या मनाचा ग्रह अधिकाधिक होऊं लागला. ती तरुणी चांगल्या कुलीनाची दिसत होती व मी सौंदर्याने जरी केवळ टाकाऊ नव्हतों- असे माझे मन मला सांगत होतें- तरी परिचय नसल्यामुळे ती कोणच्याही तऱ्हेनें सहेतुक दृष्टीनें मजकडे पाहील असें शक्य नव्हतें अर्से एकदां वाटे. साधारण चांगले स्वरूप, ऐन ज्वानीमध्ये प्रकृती निकोप, पेहराव चांगला, गर्भश्रीमंतीचें थोर्डेबहुत अंगावर तेज इतकीं साधनें मला अनुकूल असतां तिच्या डोळ्यांना मजकडे पहाण्याचा मोह कां न पडावा असा दुसरा विचार मनांत येई. विकारवश झालेल्या मनु- व्याच्या मनांत विचाराचे काहूर कसें उद्भवते याची कल्पना प्रत्येक मनुष्यमात्रास आहेच. तेव्हां माझ्या मनाची स्थिती या वेळेस काय होती