पान:मयाची माया.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ८ वा. 66 केल्या ह्मणून माझ्या ध्यानात येईना ! एकदा असे वाटे कीं, तो पिरोज आज कॉलेजमध्ये आला आहे असें मनुभाईनें येऊन सांगितले की, इकडे अशरीन दृष्टीस पडल्याबरोबर तिची व पिगेजची गांठ पडण्यापूर्वी तिला गाडीत बसवून आपण तिच्याबरोबर हिंडायला जावें व त्या लबाड मनव्याच्या लंगडा झालेल्या त्या पिरोजच्या आतां नाहीं लागूं नको झणज त्याची ब्याद मी नाहींशी केलीच असं तूं समज! " पण लागलीच असा विचार मनांत येई कीं, इतकं करण्यापेक्षां चट्कन् आपण आपल्या बि-हाडी जाऊन बसावं; नाहींतर आजच्या आज आपल्या पेटलाइलाच अनिघूत्र जावं ह्मणजे यापुढे विनाकारण ही भानगडच नको आपल्याला ! छे. अर्से केल्यावर मग त्यात काय राहिलें ? काल संध्याकाळपासून यशरीनसाठी आपण जो इतका त्रास सोसला तो कशासाठीं ! आणखीं असं केलें तर शिरीनसारखी लावण्यसंपन्न तरुणी आपल्याला मिळण्याची आशाच नको ! छे, तें कांहीं नाहीं; वाटेल तें झालं तरी बेहेत्तर; पण शिरीनला ह्मणून आतां हातची जाऊं द्यायची नाहीं ! असा निश्चय ठरवून मी शिरीनची वाट पहात रस्त्यावर इकडून तिकडे हेलपाटे घालीत राहिलों. तीन वाजून तर नसतीलना गेले, आणखी कदा- चित् आपल्याला कॉलेजच्या बाहेर येण्यालाच उशीर नसेलना झाला ! न जाणो आपण बाहेरच्या बाजूला कोठें दिसत नाहीं असं पाहून शिरीन कॉलेजमध्ये येऊन सर्वांसमक्ष आपली मेट घेण्याला लाजल्यामुळे कदाचित् ती दाराशी येऊन तशीच परत गेली असेल ! अशी शंका मनांत येऊन मी रस्त्याकडे आपली पाठ फिरविली; व कॉलेजच्या बाहे रच्या बाजूला उभा राहिलों तोंच मागल्या बाजूने कोणी तरी इसम येऊन त्यानें आपल्या खांद्यावर हात ठेविला आहे असा मला भास झाला. हा इसम कोण असावा असे वाटून मी बराच भ्यालों; कारण मनुभाईवांचून माझ्याशी इतक्या सलगीनें वागणारा असा दुसरा कोणताच मनुष्य सान्या मुंबईत देखील कांहीं माझ्या ओळखीचा नव्हता. पण मनुभाई कालेजमधून बाहेर आला असेल ह्मणून ह्मणावें तर तो आपल्या पुढच्या बाजूनंच येणार ! मग हें असावं तरी कोण ! हा पिरोजच तर नसेल ना आपल्याला मारायला आला ! छे, पण भरदिवसा सर्वांच्या देखत