पान:मयाची माया.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. शिरीनला भेटणें ही होती; व ती साधण्यासाठींच मी मनुभाईला तेथून यक्तीप्रयुक्तीने थोडावेळ घालविले होतें. असं करण्यांत माझा उद्देश असा होता की, रस्त्यावर जाऊन आपण उभं रहावें व शिरीन दृष्टीस पडतांच एका भाड्याच्या गाडीत बसून दोघांनी कोठं तरी हिंडायला झणून जावें ह्मणजे कोणाचीही अडकाठी न येतां एकांतांत तिच्याशी हवं तसै हितगुज करायठा सापडेल. त्याचप्रमाणे दुसऱ्या व कदाचित् पहिली पेक्षाही अधिक महत्वाच्या अशा गोष्टीकडे नुकतेंच माझें लक्ष वेधलें होतें. शिरीनच्या पत्राच्या मागील अंगावर कांहीं मजकूर लिहि लेला होता, तो वाचून पाहण्याचे माझ्या किंवा मनभाईच्या ध्यानांत आले नव्हते. पण मनुभाई जवळन मी तैं पत्र घेऊन पुन्हा वाचूं लागलों. या वेळी शिरीनच्या भेटीची वेळ तिनें कोणती लिहिली आहे अशाच- इल पूर्वीप्रमाणे पुन्हा शंका येऊनच केवळ तिचें पत्र मी वाचण्यासाठीं आपल्यापुढे घरिलें. पुढील बाजूवर लिहिलेला मजकूर यां वेळीं मी वाचिला; व ती बरोवर तीन वाजतां आपल्याला भेटायला येणार असें मनांतल्या मनांत मी दहा पांच वेळां घोंकिलें. पायाला दुखापत ● झाल्यामुळे तिला त्याबद्दल फार काळजी वाटत आहे व ती तेवढ्यासाठी पिरोजच्या ( अर्थात् माझ्या स्वतःच्या ) इतक्यांत समाचाराला येणार ही कल्पना मनांत येऊन मला माझ्या ठिकाणी असलेल्या शिरीनच्या प्रेमाबद्दल अतीशयच आनंद वाटू लागला ! पण तिच्या पत्राच्या मागील बाजूवरचा मजकूर माझ्या दृष्टीस पडतांच आतां आपका आजच्याआज याच ठिकाणीं घात होणार अशी एकाएकी भीति वाटू लागली ! काय चमत्कार आहे बोवा ? " मी त्या पत्र च्या मागील बाजूवरील मज- कूर वाचून आपल्याशीं ह्मणालों. “काय ? शिरीन काय लिहिते ? काल संध्याकाळपासून आपण पिरोज आहों असे भासवन कोणी तरी एक लबाड मनुष्य आपल्या दृष्टीस पडला तर त्याची चांगली खोड मोडल्याशिवाय मात्र तूं राहूं नको. कालरात्री आपण बंदरावरून निघालां तेव्हांपासून कसा मेला तो मधून मधून लुडबुडन असतो पाहिलास ना !" el हा मजकूर मी मनांत वाचलां खरा. पण शिरीननें तो मला उद्देशून लिहिला आहे की खन्या पिगेजला उद्देशून लिहिला अहे हैं कांही