पान:मयाची माया.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ८ वा - "त्यावरून तुझ्या लक्षांतही पप्प आलेच असेल कीं, ती शिरीन कां कोण ती- काय तिचं नांव असंच कायसं आहे नाहीं--त्याला भेटायला येण्या- पूर्वी हे पत्र त्याला मिळणं अवश्य आहे असं मला वाटतं ! हाणून मी 'तुला ह्मणतों कीं, पिरोज या नांवाचा कोणी पारशी विद्यार्थी तुझ्या या

  • कॉलेजमध्यें आहे कीं नाहीं याचा लवकर तपास कर. "

" अरे, तूं ह्मणतोस खरं; पण लागलीच त्याचा तपास लागावा कसा ? आमच्या कॉलेजमध्ये कितीतरी पारशी विद्यार्थी आहेत; आणखी त्यांत पिरोज या नांवाची देखील कदाचित् एकापेक्षा अधिक मुलं असण्याचा संभव आहे. शिवाय आज कदाचित् तो तुझा पिगेज कॉलेजमध्यें 'आलेला नसला तर तो आतां कसा भेटायचा ? आणखी त्याला ओळ- खायचा तरी कसा ? " 6 अरे, त्याला ओळखायला एक युक्ती आहे. हे पाहिलंस को पत्रांत च्या शिरीननं काय लिहिलं आहे तें ? असें ह्मणून, कालरांत्रों चोरांनी मारल्यामुळे पिरोजच्या एका पायाला दुखापत झाली होती; व त्याच्या पायाबद्दल आपल्याला फार काळजी चाटत आहे अशा अर्थाचें शिरीननें पत्रात लिहिलेले वाक्य मीं त्याला दाखविलें; व त्याचा लवकर तपास करून येण्याला मनुभाईला पुन्हा -सांगितले आणि त्याप्रमाणे लागलीच तो लेथून गेला. माझ्याजवळ अस प्लेले घड्याळ त्यावेळीं बरोबर नव्हतें; व कदाचित् तीन वाजण्याचा सुमार झाला असावा; आतां शिरीन आपल्याकडे येणार; पण या ठिकाणी तिला भेटण्याची काय युक्ती करावी याबद्दल मी बराच वेळ विचार करीत होतों. मनुभाईशी आपण बोलत असतांना कदाचित् तीन वाजण्याची वेळ होऊन शिरीन एकदम आली तर ती आपल्याला 'पाहतांच कांहीं तरी बोलल्याशिवाय कांहीं राहणार नाहीं, असें वाट्नच 'मनुभाईला मीं पिरोजचा तपास करण्यासाठी ह्मणून पाठवून दिला; पण तो जातांना त्याच्या हातामधून शिरीनचें तें सब चटकन् घेण्याला मात्र मी विसरलों नाहीं. या माझ्या एका युक्तीनें मला दोन गोष्टी साधावयाच्या होत्या; त्यापैकी पहिली झटली ह्मणजे कोणालाही शंका न येईल अशा रीतीनें