पान:मयाची माया.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची याया. --26 अरे मला काय त्याबद्दल वाटायचं आहे ! मी गंभीरपणानें उद्गा-- बलों. " पण हा पिरोज एकंदरीने मोठा चमत्कारीक माणूस असला पाहिजे असं नाही कां तुला वाटत ? अरे, दुसऱ्याच्या मुलीला आपल्या नाहीं लावून या कॅॉलेजसारख्या ठिकाणी तिला भेटायला बोलवायचं ह्मणजे केवढं धाडस, केवढा अविचार ! मला तर वाटतं हा पिरोज या मुंबई- मधलाच राहणारा असला पाहिजे ! " 6 कुठला कां असेना. तुला काय करायचं आहे त्याचं ?, " अर्से नव्हे रे ! त्या पारशी तरुणीनें हैं पत्र आमच्या नंदशंकरशेट- जींच्या गड्याजवळ दिले तेव्हां 'पिरोजशेट कालरात्री तुझ्या शेटजीकडे आले असल्याचं मला कळलं आहे' असे ती म्हणाली. या पत्राच्या पाकि टावर कोणाचंच नांव नव्हतं; आणखी है काय प्रकरण आहे ते मला माहीत असेल असं समजून गड्यानं हे पत्र माझ्याजवळ दिलं. तेव्हां नंदशंकरशेटजीकडे या भानगडीचा कांहीं संबंध येऊं नये ह्मणून त्यां पिरोजची चवकशी करावी व हे पत्र एका पाकिटांत बंद करून त्याला द्यावं असं मला वाटतं. पण असलं पत्र भलत्याच माणसाच्या हातीं जाऊं नये म्हणून तर पिरोजची बरोबर माहिती लागली पाहिजे. " अशा प्रकारचें माझें बोलणे ऐकून त्याच्या मनांत मजबद्दल आलेली शंका क्षणमात्र दूर झाली असावी असें मीं ठरविलें. कारण तो ह्मणाला " असंच असलं तर पिरोजची चवकशी करणं हैं ठीक आहे. पण मी ह्मणतों कीं, आपल्याला या भानगडींत पडून काय करायचं आहे ? तो कोणी कां असेना ?" त्याची समजूत बदलली आहे असे लक्षांत येतांच मला फार समाधान झालें; व आतां आपल्याला पाहिजे ती सर्व माहिती याच्याकडून आपण सहज काढून घेऊं अशी आशा माझ्या मनात उत्पन्न होऊन मी ह्मणालों ' मला काय त्याच्याशीं करायचं आहे. हे पत्र माझ्या हाती लागलं नसतं तर मीरे कशाला या भानगडींत पडलों असत ! पण असल्या प्रकारचं पत्र वेळेवरच ज्याचं त्याला पोंचविणं प्रत्येकाचं काम आहे असं मी समजतों. आणखी तें पत्र त्याला मिळालं ह्मणजे आपण सुटलों. तसं नसतं तर आतांच्या आतां हें काम झालं पाहिजे असं मी तुला सांगितलं नसतं; पण तूं वाचलाच आहेस पत्रांतला मजकूर आणखी