पान:मयाची माया.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ प्रसंग. ८ वा. बसलो असतो. माझा काय त्यांत संबंध आहे ? कोण पिरोज, आणखी कोण ती शिरीन ! मला रे त्यांच्यांशी काय करायचं आहे ? पण आपलं. सहज असलं पत्र वाचायला मिळालं तेव्हां ह्यटलं काय मजा आहे ती तर 'पाहूं अनायास आपल्या दृष्टीस पडली तर !” असे बोलून मी थोडा. बेळ थांबलों व पत्राबद्दल आतां त्याच्या मनांत शंका उरली नसेल अर्से वाटून पुढे झणालों " कोणरे हा फिरोज ? तुमच्या याच कॉलेजांतला कोणी विद्यार्थी आहे वाटतं ! ” " असेल कोणी तरी झालं, मला तरी काय करायचं आहे त्याच्याशीं आणखी तुझं तरी काय अडलं आहे त्याच्यावांचून !" " अडायचं कसलं रे त्यांत, पणा आपलं सहज विचारलं तुला. लो कोणी तरी मोठ्या श्रीमंताचा मुलगा असला पाहिजे विद्यार्थी दशेत असले ढंग करायला ! - " कां ! गरीब असला तर त्याला असं करता येत नाहीं कीं काय ? १ माझ्या तोंडाकडे एकसारखी टक लावून पहात, तो ह्मणाला. मी त्याच्याकडे न पाहतो आपली नजर चटकन एका बाजूला बळ- विली; तरी पण येथे कांहीं तरी पाणी मुरतें आहे असे. माझ्या चर्येवरून त्याला वाटले असावें; कारण मी बोलत नाहीं असे पाहून तो मुद्दामच आपली दृष्टी माझ्या तोंडाकडे फिरवून पुढे ह्मणाला 66 तुझ्यासारखा अविचारी तरुण तर असल्या गोष्टीच्या नादों सहज लागायचा. पण असली तंत्रें मोठीं कठीण, भयंकर असतात. त्यांचा परिणाम पुष्कळ वेळां फार वाईट होत असतो हे त्यांना कळत आहीं ! " s हे वाक्य वास्तविक त्याने माझी कांहीं तरी थट्टा करण्याच्या हेतूनेंच - उच्चारलें होतें; क. शिरीनच्या नादी लागण्याचा अपराध जर माझ्या हातून घडला नसतां तर मला त्याच्या बोलण्याचें कांहीं वाटण्याचे देखील. कारण नव्हतें; पण हा आपली चेष्टा करीत आहे. हे. त्यावेळी माझ्या ध्यानांत आले नाहीं; व मी मुद्दामच रागाचा आविर्भाव आणून म्हणालों काय या पत्राशीं माझा. कांहों संबंध असेल असे तुला वाटते की काय ?" · मी नुसते तुझ्यासारखे तरुण असे ह्मणालों ह्मणाने त्यावरून मी तुझ्या बद्दलच कांहीं ह्मणाकों असं रे कां तुला वाटावं ? "