पान:मयाची माया.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. ६ हे ऐकतांच पत्रांतील थोडा तरी मजकूर त्याच्या दृष्टीस पडला असावा. व सर्व पत्र वाचायला मिळावे अशी इच्छा मनांत उत्पन्न झाल्याचे त्याच्या मुद्रेवरून मला बाटू लागले आणि आतां विनाकारण आढेवेढे न घेतां कांहीं तरी बाहणा करून आपण होऊनच पत्र त्याला दाखवावें ह्मणचे त्याच्याकडून आपल्याला जी कांहीं माहिती काढून घ्यावयाची आहे ती आपल्याला सहजच मिळेल. अशी युक्ती मनात आणून मी मोठ्यानें हंसलों, व विस्मययुक्त दृष्टीनें त्याच्याकडे पाहून ह्मणालों मनुभाई, या पत्राशी आपल्यापैकी कोणाचाच संबंध नाही. ते सहज माझ्या हाती आले. आणखी वाचून पाहिलें तों तें मोठें मौजेचें वाटल्यावरून तुला तें दाखवावें ह्मणून तुझ्या- कडे घेऊन आलो. , याप्रमाणे मनुभाईला कांहीं तरी खोटें सांगून ते पत्र मी त्याच्या हाती दिले. त्यानें पत्रामधील मजकुरावर आपली नजर फिरविली, व किंचित् आश्चर्ययुक्त मुद्रा करून तो उद्गारला ! ' अरे, पण हे पत्र तुझ्या हाती आलं याचं मला आश्चर्य वाटतं ! 6 त्यांत आश्चर्य कसलं ? कांहीं तरी चुकीनच ते माझ्याकडे आ असलं पाहिजे ! . झणजे ? " · " ह्मणजे काय ” ? माझ्याबद्दल त्याला संशय येऊं नये ह्राणून मी मुद्दाम पत्राबद्दलची कांहीं तरी खोटी हकीकत सांगू लागलों " आमच्या नंदशंकरशेटजींच्या एका गड्याजवळ हे पत्र पिरोजला देण्यासाठी ह्मणून आज सकाळी एका पारशी तरुणीने आणून दिले. पाकीट बंद केलेलं असलं तरी त्यावर कोणाचंच नांव लिहिलं नव्हतं; आणखी आमच्या शेटजींच्या गड्यानं मी बाहेर येण्यासाठी निघालों तेव्हां तें माझ्यापाशी आणून दिलं. ह्मणून मीं सहजच तें फोडून वाचलं ! " 6. पण असं परक्या माणसाचं पत्र वाचणं आपल्याला कांहीं बोबा पसंत नाहीं ! " तिरस्कारयुक्त आवाजानें मनुभाई ह्मणाला. 66 तूं ह्मणतोस ते खरं; पण यामध्ये माझा मुळींच अपराध नाहीं. तें पत्र दुसऱ्याचं आहे असं जर मला समजतं तर मीरे कशाला वाचायला