पान:मयाची माया.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ८ वा. मनुभाईची व माझी गांठ पडली त्यावेळीं शिरीनचें तें पत्र चुकून माझ्या हातांत तसेंच घडी न करितां राहिले होते. त्याच्याकडे मनुभा- ईची सहजव नजर गेली; आणि त्या पत्राबद्दलची जिज्ञासा त्याच्या मनांत उत्पन्न झाली असावी असे मला त्याच्या मुद्रेवरून दिसले. ही गोष्ट माझ्या तेव्हांच ध्यानांत आली; पण तें पत्र आपण खिशांत घाल- ण्याची जर गर्दी केली तर कदाचित त्याला काही तरी शंका येईल असं वाटून मी बेफिकिरपणानें तें आपल्या हातांत तसेच राहू दिलं ! आमची बरींच प्रश्नोत्तरे झालीं तरी एतका वेळ ते पत्र माझ्या हातांतच होतें. ते खिशांत घालावें कीं नाहीं याबद्दलचा मी अजूनसुद्धां विचारच करीत होतो; पण येवढा वेळ त्याचीही नजर मधून मधून माझ्या हाता- कडे जात होतीच; व मांही पत्रांतील मजकूर होतां होईल तो त्याला दिसूं यावयाचा नाहीं अशा इच्छेनं आपला डावा हात वरचेवर इकडे तिकडे करीत होतों. तरी याबद्दल माझ्या मनामध्यें स्वस्थता मात्र मुळींच नव्हती व त्यावेळी माझी चर्या बरीच चमत्कारिक झालेली दिसत असावी असें मला वाटलें; कारण, थोड्याच वेळानें मनुभाईला इतका वेळ यानें आपल्या हातांत हा कसला कागद ठेविला आहे असे वाटून त्यानें मला विचारलें " भगवानदास, अरे, आज हा तुझ्या हातांत कागदरे कशाचा आणला आहेस ? माझं कांहीं एखादें पत्र चित्र तुझ्या पत्त्यावर आलं आहे कीं काय ? " 66 छे 37 मी मनांत चपापून ह्मणालों. "तुझं पत्र कुठलं आलं आहे. तुझं असतं तर लागलीच तें तुला देऊन नसतं कां टाकलं ? आणखी तुझं पत्र माझ्याकडे येण्याचा संभव तरी आहे कां ? " " तसं नाहीं रे, " मनुभाई हंसून ह्मणाला. " तूं पेटलादहून निघालास तेव्हां तूं मुंबईला जातो आहेस असं पाहून माझ्या बाबांनी मला देण्या- साठी झणून जर एखाई पत्र दिलं असलं तर तें कदाचित् विसरून तुझ्या जवळ तसंच राहिलं असेल; दुसरं काय ? " " छे, तसं मुळींच नाहीं. " त्याची खात्री व्हावी; पत्राबद्दल त्यच्या मनांत शंका राहूं नये झणून मी गंभीरपणाचा आव घालून लागलीच त्याला ह्मणालों.